उन्हाच्या लागताच झळा, अयोध्यातल्या बालक रामाने पेहरल्या मलमली वस्त्र कळा!!

विशेष प्रतिनिधी

अयोध्या : उन्हाच्या लागताच झळा, अयोध्येतल्या बालक रामाने पेहरल्या मलमली वस्त्र कळा!!, उन्हाचा चटका वाढू लागतात अयोध्येतल्या बालक रामाला हातमागावरचे सुती मलमली वस्त्र पेहरण्यात आले. त्याच्या अंगा खांद्यावर वजनाला हलकेसे दाग दागिने अलंकृत करण्यात आले. रंगपंचमीच्या निमित्ताने बालक रामाला अशा पद्धतीने सजवण्यात आले.As soon as the summer comes, the muslin clothes worn by the child Rama of Ayodhya are revealed!



संपूर्ण भारतात उन्हाच्या झळा लागल्याने अयोध्येत देखील बालक रामासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. बालक रामाच्या मंदिरातील गाभाऱ्यात वाळ्याच्या पाण्याचा शिडकावा करण्यात येत आहे. चंदनी उटी लावून बालक रामाची मूर्ती सजवली आहे. एरवी बालक रामाची सर्व वस्त्र कळा ही रेशमी असते, पण उन्हाच्या तीव्र झळा लागताच बालक रामाला हातमागावरच्या सुती मलमली वस्त्राचा पोशाख घातला आहे. हलक्या निळ्या रंगातील त्या पोशाखावर सोनेरी बेलबुट्टी देखील आहे.

यंदा अयोध्येत रामनवमीचा उत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा होणार आहे. लाखो भाविक त्यावेळी अयोध्येत असणार आहेत. या सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. बालक रामाच्या मूर्तीच्या पूजाअर्चा आणि सजावटीसाठी विविध तयारी सुरू आहे. अयोध्या त्यावेळी अनोख्या रंगात रंगणार आहे. त्याची सर्व सरकारी आणि बिन सरकारी पातळीवरची व्यवस्था करणे सुरू आहे. हनुमान गढी ट्रस्ट त्या संदर्भात आजच एक बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.

As soon as the summer comes, the muslin clothes worn by the child Rama of Ayodhya are revealed!

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात