मणिपूरमध्ये आज जे घडत आहे, बंगालमध्येही तीच परिस्थिती आहे, असंही सांगितलं आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मणिपूरमध्ये दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढली गेल्याने देशाच मान शरमेने झुकलेली आहे. त्याचवेळी, आता पश्चिम बंगालमध्येही अशाचप्रकारची अत्याचाराची घटना समोर आली आहे.. बंगालमध्ये मुलींना विवस्त्र करून त्यांना गावातून फिरवण्यात आल्याचे प्रकरण समोर आलं आहे. As in Manipur in Bengal too, women were stripped and paraded around the village BJP MP Locket Chatterjee cried while narrating the incident
बंगालमधील घटनेचा उल्लेख करताना भाजपाच्या खासदार नेते लॉकेट चॅटर्जी यांना अश्रू अनावर झाले. जे मणिपूरमध्ये आज जे घडत आहे, बंगालमध्येही तीच परिस्थिती आहे. असा दावा चॅटर्जी यांनी केला आहे.
चॅटर्जी एकामागून एक घटना घडत आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री महिला असूनही गप्प आहेत. शेवटी आपण कुठे जाऊ? आपणही देशाची कन्या आहोत. पश्चिम बंगाल देशाबाहेर नाही. आज जी स्थिती मणिपूरमध्ये आहे, तीच परिस्थिती बंगालमध्येही आहे. बंगालमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना लॉकेट चॅटर्जी म्हणाल्या की, मणिपूरसह बंगालचीही चर्चा झाली पाहिजे. मुली, बहिणी, माता यांच्याबाबतीत येथे काय चालले आहे. ते खूप दुःखद आहे.
पश्चिम बंगाल में महिलाओं पर हो रहे अत्याचारों की बात करते-करते रो पड़ीं भाजपा नेत्री @me_locket पूरा वीडियो देखें : https://t.co/vb2v1vTSAe pic.twitter.com/8UDU9jrpGU — BJP (@BJP4India) July 21, 2023
पश्चिम बंगाल में महिलाओं पर हो रहे अत्याचारों की बात करते-करते रो पड़ीं भाजपा नेत्री @me_locket
पूरा वीडियो देखें : https://t.co/vb2v1vTSAe pic.twitter.com/8UDU9jrpGU
— BJP (@BJP4India) July 21, 2023
कोलकाता येथील पक्षाच्या मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी मणिपूर आणि बंगालमधील महिलांवर झालेल्या क्रूरतेचा संदर्भ देताना सांगितले की, दोन घटनांमधील फरक हा आहे की पश्चिम बंगालमध्ये मणिपूरसारख्या घटनांचा कोणताही व्हिडिओ नाही. मजुमदार म्हणाले की, मणिपूरमध्ये घडलेल्या घटनांचा आम्ही तीव्र निषेध करतो. अशी घटना पुन्हा कोठेही घडू नये, पण बंगालमधील दक्षिण पंचला येथे पंचायत निवडणूक लढवण्यासाठी भाजपाच्या एका महिला सदस्याची नग्न परेड करण्यात आली. हे मणिपूरपेक्षा कमी दुःखद आहे का?
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App