वृत्तसंस्था
मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर बॉलिवूडमधून देखील आर्यन खान विषयी सहानुभूतीच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत.Aryan Khan’s bail rejected; Nawab Malik and Bollywoodkar got angryAfghan pop star Arya has accused the Taliban of being Pakistan’s puppet
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा नवनव्या लोकांना केसेस मध्ये अडकवण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप नबाब मलिक यांनी केला.आर्यन खान प्रकरणात न्यायाधीशांनी दिलेल्या निकालावर आक्षेप नाही पण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो वेगवेगळ्या पद्धतीने युक्तिवाद करते. त्यातून त्यांना नव्या लोकांना ड्रग्स केसेसमध्ये अडकवण्यात रस असल्याचे दिसून येते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
अनेक केसेस मध्ये प्रत्यक्ष पुरावे नसताना केसेसची उभारणी होते. या केसेस दीर्घकाळ लढविण्याची लोकांची तयारी नसते. त्यातून ते केसमध्ये अडकतात. अशा अनेक केसेस आपल्याला माहिती असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
आर्यन खानचा जामीन फेटाळल्यानंतर सोशल मीडियात बॉलीवूडकरांनी त्याच्या बाजूने सहानुभूतीची लाट तयार केली असून आर्यन खानला जेलमध्ये कशा प्रकारचे खाणे मिळते?, त्यामुळे तो कसा रडला. तो जेवत कसा नाही. त्याची दिवाळी जेलमध्ये कशीच साजरी होणार आहे, अशा प्रकारच्या पोस्ट केल्या आहेत. प्रसार माध्यमांनी त्यांच्या बातम्याही छापल्या आहेत.
वास्तविक न्यायालयीन प्रक्रियेनुसार आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला गेला आहे. तरी देखील नबाब मलिक आणि बॉलिवूड यांनी वेगवेगळ्या ठिकाणी एकाच प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याने त्यावर देखील सोशल मीडियात चर्चा सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App