दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती!

जाणून घ्या काय म्हणाले उच्च न्यायालयाने सुनावणीत नेमकं काय म्हटलं?


विशेष प्रतिनिधी

दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. एका दिवसांपूर्वी कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. मात्र शुक्रवारी या जामिनाला अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले.Arvind Kejriwals bail plea in Delhi Excise Duty case stayed

ईडीने उच्च न्यायालयात केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर सुनावणी होईपर्यंत स्थगिती दिली आहे.



काय प्रकरण आहे

दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना 2 जून रोजी संपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 20 दिवसांचा जामीन देण्यात आला होता. तेव्हापासून अरविंद केजरीवाल दिल्लीच्या तिहार तुरुंगात होते. दरम्यान, गुरुवारी 20 जून रोजी अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा जामीन मिळाला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आम आदमी पक्षातही आनंदाची लाट उसळली होती. ‘आप’च्या अनेक नेत्यांनी हा सत्याचा विजय असल्याचे म्हटले होते.

काय होता ईडीचा युक्तिवाद?

मात्र, एका दिवसानंतर या निर्णयाला अंमलबजावणी संचालनालयाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि न्यायालयाने याप्रकरणी केजरीवाल यांच्या जामिनाला स्थगिती दिली. ईडीने सांगितले की त्यांची बाजू अद्याप ऐकली गेली नाही आणि केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आमची बाजू ऐकून सुनावणी पूर्ण होईपर्यंत केजरीवाल यांना जामीन देऊ नये. याला सहमती दर्शवत न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या जामीनाला तूर्तास स्थगिती दिली आहे.

Arvind Kejriwals bail plea in Delhi Excise Duty case stayed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात