Arvind Kejriwal दिल्लीत नवे सरकार येण्यापूर्वीच केजरीवालांची अडचण; CVC चौकशीच्या फेऱ्यात अडकला शीश महल!!

Arvind Kejriwal

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे सरकार जाऊन नवे भाजपचे सरकार येण्यापूर्वीच केजरीवाल अडचणीत आले त्यांनी बांधलेला शीश महल (CVC) Central vigilance commission अर्थात केंद्रीय दक्षता समितीच्या चौकशीत अडकला.

CVC ने केजरीवाल यांनी बांधलेल्या मुख्यमंत्री निवासस्थानाच्या सुशोभीकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. शीश महल बांधताना आणि त्याच्या सुशोभीकरणासाठी केजरीवालांनी १५० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत हा शीश महल फार गाजला. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होण्यापूर्वी साध्या घरात राहत होते. साधी वॅगन आर कार वापरत होते. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्या टर्म मध्ये त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसाठी भव्य निवासस्थान बांधले‌. त्यात मोठा भ्रष्टाचार झाला म्हणून माध्यमांनी त्याला शीश महल म्हणजेच आरसे महाल असे नाव दिले.

केजरीवालांनी दिल्लीच्या सरकारी तिजोरीतून शीश महल सजवण्यासाठी १५० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप झाला. याच शीश महल मध्ये खासदार स्वाती मालीवाल यांना केजरीवालांच्या पीएने मारहाण केली. ते प्रकरण केजरीवालांच्या अंगलट आले. केजरीवालांची दिल्लीतली सत्ता गेली. त्या पाठोपाठ आता शीश महल आणि त्याचे सुशोभीकरण आणि त्यानिमित्ताने स्वतः केजरीवाल CVC च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले.

केजरीवाल दारू घोटाळ्याच्या आरोपाखाली आधीच एका खटल्यात अडकलेत. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. आता शीश महलच्या CVC चौकशीनंतर केजरीवाल आणखी गोत्यात येण्याची शक्यता आहे.

Arvind Kejriwal problem even before the new government comes to power in Delhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात