आजारी पडून जामीन मिळवण्यासाठी डायबिटीस पेशंट केजरीवालांचा तुरुंगात आंबे आणि मिठाईवर ताव!!

Arvind Kejriwal News Live Updates:

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात तिहार तुरुंगाची हवा खात असलेल्या पण मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला चिकटून राहिलेल्या अरविंद केजरीवालांची तिहार तुरुंगातही मज्जाच मज्जा चालली आहे. केजरीवालांना डायबेटीस आहे पण तरी देखील आजारी पडून वैद्यकीय कारणांसाठी आपल्याला जामीन मिळावा यासाठी केजरीवाल तुरुंगात आंबे आणि मिठायांवर ताव मारत आहेत. इतकेच नाही, तर ते मुद्दाम साखरेचा चहा घेत आहेत. हे सगळे सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने आज न्यायालयात सांगितले.Arvind Kejriwal News Live Updates: Kejriwal eating food high in sugar despite diabetes to make grounds for bail, ED tells court

त्यावर न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा डाएट चार्ट कोर्टाला सादर करा, इतकेच नाहीतर तिहार तुरुंगातला डाएट चार्ट देखील सादर करा, असे आदेश अरविंद केजरीवालांच्या वकिलांना आणि तिहार तुरुंगाच्या प्रशासनाला दिले.



दिल्लीत तिहारच्या तुरुंगात अरविंद केजरीवालांचा मुक्काम हा गँगस्टर छोटा राजन याला ज्या कोठडी ठेवले होते, तशाच कोठडीत आहे. पण ते मनी लॉन्ड्रीगच्या म्हणजेच आर्थिक घोटाळ्यातले कैदी असल्याने त्यांना संबंधित कायद्यांना देण्यात येणारच सुविधा पुरविण्यात येत आहेत. पण केजरीवाल तुरुंगात आंबे आणि मिठायांवर ताव मारत आहेत.

वास्तविक त्यांना डायबेटीस असल्याने कुठलेही साखर युक्त पदार्थ खाण्यास बंदी आहे, पण केजरीवाल ही बंदी झुगारून आंबे आणि मिठाया खात आहेत, इतकेच नाही तर ते बिन साखरेचा चहा घेण्याऐवजी चहामध्ये साखरच घालून दिली पाहिजे, असा आग्रह धरून साखरेचा चहा घेत आहेत, असे ईडीने आज कोर्टात सांगितले. आपण जास्तीत जास्त साखर युक्त पदार्थ खाल्ले की आपली ब्लड शुगर वाढेल. त्यामुळे तब्येतीचे कारण दाखवून आपल्याला कोर्ट जामिनावर सोडून देईल, असा केजरीवालांचा होरा दिसतो आहे. पण ईडीच्या या पेशीनंतर कोर्टाने अरविंद केजरीवालांचा बाहेरचा आणि तुरुंगातला दोन्ही डाएट प्लॅन अधिकृतरित्या मागितले आहेत. त्यानंतरच कोर्ट केजरीवालांच्या जामीन अर्जावर निर्णय देणार आहे.

Arvind Kejriwal News Live Updates: Kejriwal eating food high in sugar despite diabetes to make grounds for bail, ED tells court

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात