मोदीजी, तुमच्या सरकारकडून कोणतीही बातमी लीकच होत नाही हो!!; अरुण पुरींनी बोलून दाखवली मीडियाची गोची

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : खरी बातमी… जी मीडिया गेल्या आठ वर्षात कधी करूच शकला नाही, ती खंत इंडिया टुडेचे प्रमुख अरुण पुरींनी इंडिया टुडे कन्क्लेव्ह मध्ये बोलून दाखवली. किंबहुना अरुण पुरींनी मीडियाची झालेली गोचीच पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर उघड केली. Arun puri spoke of media’s shortcomings to sneak in modi government

मोदीजी, मीडिया तुमच्या सरकारमुळे खूप परेशान आहे. तुमच्या सरकार मधून कोणतीही बातमी लीकच होत नाही, जी पूर्वीच्या सरकारमधून व्हायची. तुमचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोण असणार?, हे मीडियाला माहिती होत नाही. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची बातमी तर तुम्ही विसरूनच जा. राज्यात मुख्यमंत्री कोण होणार?, ते मीडियाला समजत नाही. गेल्या काही वर्षांत मीडियाला खरी बातमी कधी मिळालीच नाही. पण मोदीजी गुस्ताखी माफ. आपण मला विचाराल अरुण भाई आपकी दुकान मैं क्यू चलाऊं??, त्यावर मोदीजींनी उत्तर दिले, आज आप की दुकान मैं ही चला लेता हूं!!

इंडिया टुडे कन्क्लेव्ह मध्ये घडलेला हा किस्सा आहे. पण अरुण पुरींनी बोलून दाखवलेली खंत ही खरंच देशातल्या सगळ्या मीडियाची खरी गोची झाल्याचे स्पष्ट करते!!

मीडिया सूत्रांच्या हवाल्याने जेवढ्या म्हणून बातम्या गेल्या 8 वर्षात दिल्या आहेत, त्या सगळ्या खोट्या ठरल्या आहेत. आधीच्या सरकारांमधून, नोकरशाहीमधून खरंच बातम्या लीक होत होत्या. त्यामुळे अनेकांना ब्रेकिंग न्यूज, स्कुप्स मिळत होते. बोफोर्स घोटाळा ही बातमी चित्रा सुब्रमण्यम नावाच्या पत्रकाराला अशाच सरकार मधून झालेल्या माहितीच्या लीक मधूनच मिळाली होती. पण तो नंतर फार मोठा खूप स्कूप ठरला होता.

https://youtu.be/6ZxuF9nJ0k4

मोदी सरकारच्या काळात अशी अवस्था उरलेली नाही. मीडियाचे कोणतेही सूत्र थेट मोदींपर्यंत पोहोचणे सोडाच, त्यांच्या कार्यालयापर्यंत अथवा संरक्षण, गृह, अर्थ या मंत्रालयांपर्यंत पोहोचण्याची सुतराम शक्यता नाही. पोहोचलेच तर बातमी मिळण्याची शक्यता नाही आणि लीक होण्याची तर सुताराम शक्यता नाही!!

त्यामुळेच अरुण पुरींनी बोलून दाखवलेली खंत ही प्रामाणिक तर आहेच, पण त्या पलिकडे मीडियाचे खुजेपण दर्शवणारी देखील आहे.

विशेषतः मराठी मीडियाने तर यातून खूप मोठा धडा घेण्याची गरज आहे. 2019 पासून मराठी मीडियावर “पॉवर गेमचे” गारुड आहे. पण या तोकड्या राजकीय कर्तृत्वाच्या “पॉवर गेम” मध्येच अडकल्यामुळे मराठी मीडियाला गेल्या अडीच वर्षात एकही स्कूप मिळवता आलेला नाही. मीडियाने चालविलेल्या भाजप मधल्या बंडाच्या बातम्या फुसक्या ठरल्या. इतकेच नाही, तर सहा – आठ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या बंडाची बातमी, ते सुरत मध्ये पोहोचेपर्यंत मराठी मीडियाच्या हाती लागली नव्हती. 40 आमदार महाराष्ट्रातून निघून गेले. पण मराठी मीडियाला त्याची साधी भनकही लागली नव्हती.

सूत्रांच्या हवाल्याने मराठी मीडिया देखील बातम्यांचे पतंग उंच उंच उडवतो. पण खरी बातमी त्याच्या हातालाही लागत नाही. मराठी मीडियाची उडी “पॉवर गेम” च्या कुंपणाच्या आतच पडते. अरुण पुरींनी बोलून दाखवलेली खंत प्रामाणिक तर आहेच, पण ती देशातल्या मीडियाची खरी गोची आहे आणि मराठी मीडियाचे तर ते भीषण वास्तव आहे!!

Arun puri spoke of media’s shortcomings to sneak in modi government

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात