प्रतिनिधी
धुळे : लव्ह जिहाद मधून आफताब अमिन पूनावाला याने श्रद्धा वालकरची हत्या करून तिचे 35 तुकडे करण्याचे प्रकरण ताजे असतानाच धुळ्यातूनही अशाच लव्ह जिहादची एक दर्दनाक कहाणी समोर आली आहे. अर्षद सलीम मलिक या तरुणाने लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या तरुणीवर अत्याचार करून तिला 70 तुकडे करण्याची धमकी दिल्याची फिर्याद या तरुणीने पोलिसांमध्ये दिली आहे. या फिर्यादीत तरुणीने आपल्यावर झालेले अत्याचार आणि सक्तीने केलेले धर्मांतर याची भयानक कहाणीच विशद करून सांगितली आहे. Arshad Salim Malik tortured the girl and gave 70 pieces
ही तरूणी २४ वर्षांची आहे. तिचे पहिले लग्न झाले असून त्या पतीपासून तिला एक मुलगा आहे. या तरुणीने पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. आपल्याला सक्तीने धर्मांतर करायला लावले, पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला आणि या तरुणाच्या पित्याने आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार केले, असेही पीडिताने फिर्यादीत नमूद केले आहे.
Love Jihad : लव्ह जिहाद बद्दल मुस्लिम उच्चपदस्थांचे उफराटे बोल; एस. वाय. कुरेशी गयासुद्दीन शेख यांचा “नवा बुद्धिवादी पॅटर्न”!!
अर्शद सलीम मलिक नावाच्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या तरुणाने 29 नोव्हेंबर रोजी ही धमकी या तरुणीला दिली. जुलै 2021 पासून ते दोघे एकत्र राहतात. त्याआधी 4 एप्रिल 2016 रोजी तिचा पहिला विवाह झाला. 2017 मध्ये तिला मुलगा झाला. सन 2019 मध्ये तिच्या पतीचे रस्ता अपघातात निधन झाले. त्यानंतर तिची एका अकॅडमीत हर्षल माळी नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्याने तिला लळिंग येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्याचा छुपा व्हिडिओ बनवून तिला धमकावले.
त्यांनी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतल्यावर जुलै 2021 मध्ये लिव्ह इन रिलेशनशिपबाबत अमळनेर येथे प्रतिज्ञापत्र तयार करायला गेले. ते करताना या तरुणाचे नाव हर्षल माळी नसून अर्शद सलीम मलिक असल्याचे तिला समजले. अर्शदने तिला उस्मानाबाद येथे एका फ्लॅटमध्ये नेले. तिथे त्याचा पिता सलीम बशीर मलिक याने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले, असे या तरूणीने फिर्यादीत नमूद केले आहे.
4 महिन्यांनी अर्शदने तिला धुळे शहरातील विटा भट्टी भागातील घरी आणले. 26 ऑगस्ट 2022 रोजी तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतरही सलीम बशीर मलिकने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. दरम्यानच्या काळात अर्शदने तिचे धर्मांतर केले. तिच्या पाच वर्षांच्या पहिल्या मुलाची खतना करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्याला विरोध केल्यामुळे अर्शदने तिला दिल्लीतील श्रद्धा वालकरच्या बातम्यांची आठवण करून दिली. तिचे तर फक्त 35 तुकडे केले गेले, तुझे आम्ही 70 तुकडे करू, अशा शब्दात त्याने धमकावले असे पीडिताने फिर्यादीत नमूद केले आहे.
तरुणीला सायलेन्सरचे चटके
उस्मानाबाद येथे असताना सोन्याची पोत मोडण्यास नकार देताच अर्शदने आपल्याला सायलेन्सरचे चटके दिले होते, असेही तिने फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी अर्शद आणि सलीम या दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App