पश्चिम बंगालमधील नवनियुक्त पोलीस उपनिरिक्षकाची यादी सध्या व्हायरल झाली आहे. यामध्ये बहुतांश मुस्लिम नावे आहेत. त्यामागील सत्य आता समोर आले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंदू इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) डावलून मुस्लिमांना त्यांचे आरक्षण दिल्याचे उघड झाले आहे.appointed Sub-Inspectors of Police in West Bengal, Mamata Banerjee gives priority to Muslims over Hindu OBCs
विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील नवनियुक्त पोलीस उपनिरिक्षकाची यादी सध्या व्हायरल झाली आहे. यामध्ये बहुतांश मुस्लिम नावे आहेत. त्यामागील सत्य आता समोर आले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंदू इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) डावलून मुस्लिमांना त्यांचे आरक्षण दिल्याचे उघड झाले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख आणि पश्चिम बंगाल भाजपाचे सहप्रभारीअमित मालविय यांनी नव्याने नियुक्त झालेल्या पोलीस उपनिरिक्षकांची यादी ट्विटरवर शेअर केली आहे. या यादीत बहुतांश मुस्लिम नावे आहेत. मालविय यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगालमधील पोलीस दलात इतर मागासवर्गीय प्रवर्ग एकमधून (ओबीसी- ए) मधून निवड झालेल्या उमेदवारांची ही यादी आहे.
ममता बॅनर्जी यांनी ओबीसींचा हक्कच हिरावून घेतला आहे. आरक्षणातील त्यांचा हिस्सा दिला नाही. ओबीसी- ए या प्रवर्गात एकूण ८० जाती आहेत. त्यपैकी ७२ मुस्लिम आहेत. ओबीसी- बी या प्रवर्गात ४० मुस्लिम जाती आहे.
ओबीसी आरक्षणातील १७० जातींपैकी ११२ मुस्लिम आहेत. याचा अर्थ मुस्लिमांना अतिरिक्त प्रतिनिधीत्व दिल्याचे स्पष्ट होत आहे. हिंदूं इतर मागासवर्गीयांचे आरक्षण हिसकावून घेऊन मुस्लिमांना देणे हे धक्कादायक आहे.
मालविय यांनी म्हटले आहे की, मुळात पश्चिम बंगालची निर्मितीच गैरमुस्लिम बहुसंख्यांकांसाठी झाली होती. पश्चिम बंगाल हा केवळ जमीनीचा तुकडा नाही तर बंगाली हिंदू तेथे सुरक्षितपणे राहू शकतील आणि प्रगती करू शकतील ही कल्पना होती. मात्र, या कल्पनेलाच तृणमूल कॉँग्रेसने सुरूंग लावला आहे. तृणमूलकडून लोकसंख्येचे प्रमाणच (डेमोग्राफी) बदलण्याचे षडयंत्र आखले जात आहे.
भारतीय जनता पक्षाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ब्रिटीशशंना पटवून दिले होते की पश्चिम बंगालमध्ये हिंदू बहुसंख्या आहे. त्यामुळेच पंजाबप्रमाणेच बंगालचीही फाळणी आवश्यक आहे. त्यांनी ब्रिटीश शिष्टमंडळाला पटवून दिले होते की बंगालमध्ये ५६ टक्के मुस्लिम असले तरी पश्चिम बंगाल हा हिंदूबहुल भाग आहे.
त्यामुळे पंजाबप्रमाणेच बंगालचीही फाळणी आवश्यक आहे. त्यावेळी कम्युनिस्टांनी बंगालच्या फाळणीला पाठिंबा दिला होता; मात्र संपूर्ण बंगाल पाकिस्तानला द्यावा असे मत व्यक्त केले होते. मात्र, आता पश्चिम बंगालला पुन्हा मुस्लिमबहुल केले जात आहे. तृणमूल कॉँग्रसचेच हे पाप आहे.
मालविय यांनी म्हटले आहे की २० जून हा पश्चिम बंगालचा स्थापना दिवस आहे. मुस्लिम लिगकडून संपूर्ण बंगाल पाकिस्तानात घेण्यासाठी जोर लावला जात असताना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्य प्रयत्नामुळेच हिंदूबहुल पश्चिम बंगाल भारतामध्ये राहिला आहे. मात्र, आता बंगाली हिंदूंवर आलेली ही वेळ पाहिल्यावर त्यांना काय वाटत असेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App