वृत्तसंस्था
नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियामधील ( Russia )युद्ध पुन्हा एकदा तीव्र झाले आहे. भारतीय दूतावासाने बुधवारी रशियामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे. बेल्गोरोड, कुर्स्क आणि ब्रायन्स्क भागात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना हे भाग सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे.
भारतीय दूतावासाने भारतीयांना सांगितले की ते कोणत्याही मदतीसाठी पूर्णपणे तयार आहेत. दूतावासाने एक ई-मेल जारी केला आहे- edu1.moscow@mea.gov.in. एक हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांक +7 9652773414 देखील जारी करण्यात आला आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला जवळपास अडीच वर्षे उलटून गेली आहेत. आजपर्यंत या युद्धाचा निकाल लागलेला नाही. पहिल्यांदाच युक्रेनचे सैनिक रशियाच्या हद्दीत घुसले आहेत. रशियातील बोलोग्राडमध्येही आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
यापूर्वी 8 ऑगस्ट रोजी कुर्स्कमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. बेल्गोरोडच्या गव्हर्नरने म्हटले आहे की, युक्रेनच्या सेनीच्या बॉम्बहल्ल्यांमुळे घरे उद्ध्वस्त होत आहेत आणि सामान्य लोक आपला जीव गमावत आहेत.
झेलेन्स्की म्हणाले – युक्रेनचे सैन्य दररोज 2-3 किमी पुढे जात आहे
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी बुधवारी सांगितले की, युक्रेनचे सैन्य दररोज 2 ते 3 किमी रशियन हद्दीत पुढे जात आहेत. आम्ही कुर्स्कमध्ये खूप मजबूत स्थान मिळवले आहे. युक्रेनच्या लष्कराने कुर्स्कमध्ये रशियन एसयू-34 जेट खाली पाडल्याचेही त्यांनी सांगितले.
झेलेन्स्की यांनी मंगळवारी दावा केला की युक्रेनने 74 रशियन गावे ताब्यात घेतली आहेत. यासोबतच 100 रशियन सैनिकांनाही ओलीस ठेवण्यात आले आहे. युक्रेनने 4 रशियन हवाई तळांवर (व्होरोनेझ, कुर्स्क, सावस्लेका आणि बोरिसोग्लेब्स्क) मोठा ड्रोन हल्ला केल्याचा दावा केला आहे.
2 लाख रशियन लोकांनी आपली घरे सोडली
युक्रेनच्या हवाई दलाने बुधवारी दावा केला की त्यांनी 17 रशियन ड्रोन पाडले आहेत. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने अचानक केलेल्या हल्ल्यानंतर 2 लाख रशियन नागरिकांना घर सोडून पळून जावे लागले आहे. त्यांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे.
युक्रेनने 6 ऑगस्ट रोजी रशियाच्या कुर्स्क भागावर हल्ला केला. त्याने 13 ऑगस्टपर्यंत 1000 चौरस किमी क्षेत्र काबीज केले. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, दुसऱ्या महायुद्धानंतर कोणत्याही देशाने रशियाच्या हद्दीत घुसखोरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सीएनएनच्या म्हणण्यानुसार, युक्रेनने केवळ 7 दिवसांत रशियाचा एवढा भाग काबीज केला जितका रशियाने यावर्षी युक्रेनच्या भूभागावर केला आहे. यूएस-आधारित इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर (ISW) नुसार, रशियाने 2024 मध्ये युक्रेनमधील 1,175 चौरस किलोमीटर क्षेत्रावर कब्जा केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App