आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली, ज्यामध्ये 13 नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला असून 11 जणांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. ज्येष्ठ आमदार धर्मा प्रसाद राव यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.AP Cabinet Ministers List: Andhra Pradesh Chief Minister Jagan Mohan Reddy reshuffles cabinet, 25 ministers take oath
वृत्तसंस्था
अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली, ज्यामध्ये 13 नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला असून 11 जणांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. ज्येष्ठ आमदार धर्मा प्रसाद राव यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेले ते सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत. राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांनी राजधानी अमरावती येथे राज्य सचिवालयाजवळील सार्वजनिक कार्यक्रमात 25 मंत्रिमंडळ सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
विधान परिषदेतील एकाचाही मंत्रिमंडळात समावेश नाही. नवीन मंत्रिमंडळ संपूर्णपणे जात आणि समुदायाच्या आधारावर तयार करण्यात आले असून त्यात 10 मंत्री मागासवर्गीय आहेत. मुख्यमंत्र्यांसह दोन अल्पसंख्याक समाजातील, पाच अनुसूचित जाती (एससी) आणि एक अनुसूचित जमाती (एसटी) मधील आहेत. रेड्डी आणि कापू समाजातील प्रत्येकी चार जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळात चार महिला सदस्य असून त्यापैकी एकाला दुसरी संधी देण्यात आली आहे.
वायएसआर म्हणाले सोशल कॅबिनेट
मागील मंत्रिमंडळात प्रत्येकी एक प्रतिनिधी असलेले कम्मा, क्षत्रिय आणि वैश्य समाज आता यातून पूर्णपणे बाहेर पडले आहेत. पुन्हा ब्राह्मण समाजातील कोणालाही संधी दिली नाही. राज्यातील 26 पैकी किमान सात जिल्ह्यांना नवीन मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने “सामाजिक मंत्रिमंडळ” असे वर्णन केले आहे, ज्यात इतर मागासवर्गीय (ओबीसी), एससी, एसटी आणि अल्पसंख्याक समुदायांचे 70 टक्के प्रतिनिधी आहेत.
#UPDATE | Andhra Pradesh Chief Minister Jagan Mohan Reddy revamps Cabinet, here is the list of the new team. pic.twitter.com/XtekKE5Gej — ANI (@ANI) April 11, 2022
#UPDATE | Andhra Pradesh Chief Minister Jagan Mohan Reddy revamps Cabinet, here is the list of the new team. pic.twitter.com/XtekKE5Gej
— ANI (@ANI) April 11, 2022
2019 मध्येच जाहीर केली होती अडीच वर्षांनी मंत्रिमंडळ बदलाची बाब
रेड्डी यांनी 30 मे 2019 रोजी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हाच त्यांनी जाहीर केले की ते अडीच वर्षांनी (डिसेंबर 2021) 90 टक्के नव्यांना आणि 10 टक्के (म्हणजे तीन मंत्र्यांना) मंत्रिमंडळात संधी देतील. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त फक्त दोन जुने मंत्री ठेवले जाणार होते, परंतु रेड्डी यांनी पुन्हा मागील मंत्रिमंडळातील 11 लोकांना दिले आहे, ज्यांना 7 एप्रिल रोजी राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते.
अमजथ बाशा शेख बेपारी आणि के. नारायण स्वामी (माजी उपमुख्यमंत्री) यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. बोट्सा सत्यनारायण, पीआरसी रेड्डी, पी. विश्वरूप, ए. सुरेश आणि बुग्गाना राजेंद्रनाथ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले.
हे आहेत नवीन मंत्री
अप्पाला राजू, वेणुगोपाल कृष्णा, जी. जयराम आणि टी. वनिता यांना दुसरी संधी मिळाली आहे. आमदार म्हणून दुसरी टर्म पूर्ण करणाऱ्या चित्रपट अभिनेत्री आरके रोजा यांनाही अखेर मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते अंबाती रामबाबू यांनाही यावेळी मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. मंत्रिमंडळातील नव्या चेहऱ्यांमध्ये गुडीवडा अमरनाथ, पी. राजन्ना डोरा, बी. मुत्याला नायडू, दादीसेट्टी रामलिंगेश्वर राव, केव्ही नागेश्वर राव, के. सत्यनारायण, जे. रमेश, व्ही. रजनी, एम. नागार्जुन, के. गोवर्धन रेड्डी आणि उषा श्रीचरण यांचा समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App