विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) केलेल्या चौथ्या सिरो सर्व्हेमध्ये दिलासादायक माहिती पुढे आली आहे. देशातील ६७ टक्के लोकांमध्ये कोरोनाविरुध्द लढण्यासाठीच्या अॅँटीबॉडी विकसित झाल्या आहेत. लहान मुलांमध्ये संसर्गाचा धोका कमी असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सुरू करण्याचा सल्लाही आयसीएमआरने दिला आहे.Antibodies developed against corona in 67% of the country’s population, Advice to start primary school too
मंगळवारी 21 राज्यातील 70 जिल्ह्यांमध्ये जून-जुलै महिन्यात झालेल्या चौथ्या सिरो-सव्हेर्चा अहवाल जाहीर करण्यात आला. अहवालानुसार, देशातील 67% लोकसंख्येत अँटीबॉडी विकसित केली गेली आहे. म्हणजेच, ही लोकसंख्या संक्रमित झाली आहे आणि व्हायरसचा प्रभाव नष्ट करण्यासाठी या लोकांच्या शरीरात आवश्यक अँटीबॉडी विकसित झाल्या आहेत.
यामध्ये मोठ्या संख्येत मुलांचा समावेश आहे. यासह, शाळा सुरू करण्याच्या प्रश्नावर आयसीएमआरच्या डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, शाळा उघडता येऊ शकतात, कारण लहान मुलांमध्ये संसर्ग होण्याचा धोका प्रौढांपेक्षा कमी असतो. युरोपमधील बºयाच देशांमध्ये कोरोना वाढत असूनही असूनही शाळा सुरू झाल्या आहेत. प्राथमिक शाळा सुरुवातीच्या टप्प्यात सुरू केल्या पाहिजेत, त्यानंतर माध्यमिक शाळा सुरू करता येतील, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
या सर्वेक्षणातील निकाल सांगताना डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, देशातील दोन तृतीयांश लोकसंख्येमध्ये कोविड अँटीबॉडी सापडल्या आहेत. अजूनही 40 कोटी लोकसंख्येस कोरोनाचा धोका आहे. सर्वेक्षणात समाविष्ट 6 ते 17 वर्षे वयोगटातील अध्यार्हून अधिक मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळली आहेत. म्हणजेच दुसºया लाटेच्या संसगार्चा परिणाम मुलांवरही झाला आहे.
चौथ्या सेरो सर्वेक्षणात 6 ते 17 वर्षे वयोगटातील 28,975 लोकांचा समावेश होता. यामध्ये 6 ते 9 वर्षे वयोगटातील 2,892 मुले, 10 ते 17 वर्षे वयोगटातील 5,799 मुले आणि 18 वर्षांवरील 20,284 लोकांचा समावेश आहे. 18 वषार्पेक्षा जास्त वयाच्या 62% लोकांनी लस घेतली नव्हती, तर 24% लोकांनी एक डोस तर 14% लोकांनी दोन्हीही डोस घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App