कर्नाटकातही हलाल विरोधात आंदोलन जोरावर; हिंदू उतरले रस्त्यावर!!

वृत्तसंस्था

बेळगाव : हलाल अर्थव्यवस्था भारतात लादण्याच्या विरोधातील आंदोलन आता महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यांतही जोर धरू लागले आहे. कर्नाटकातील हिंदुत्वनिष्ठ संघटना या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी हातात आंदोलनाचा झेंडा हाती घेवून इस्लामी अर्थव्यवस्थेच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. Anti-Halal movement in Karnataka too

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित हलाल प्रमाणपत्र व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार मंजुनाथ जानकी यांनी निवेदन स्वीकारले.


Halal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद


या आंदोलनात ‘हमारा देश संघटने’चे व्यंकटेश शिंदे, श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकीतकर, हिंदुत्वनिष्ठ मारुति सुतार, सदानंद मासेकर, संजय राजपूत, रविकुमार करलिंगनावर, विक्रम लाड, पारितोष पोद्दार, अक्काताई सुतार, मीलन पवार, हिंदु जनजागृती समितीचे हृषिकेश गुर्जर यांच्यासह विविध संघटनांचे ३० हून अधिक प्रतिनिधी-कार्यकर्ते उपस्थित होते.

Anti-Halal movement in Karnataka too

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात