जबरदस्त रेकॉर्ड : गाझियाबाद – अलिगड द्रुतगती मार्गावर ग्रीन टेक्नॉलॉजी द्वारे 100 तासांत 100 किलोमीटर काँक्रीटीकरण!!

  • संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण; नितीन गडकरींचे ट्विट

प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद – अलिगड द्रुतगती मार्गाने एक अतिशय उल्लेखनीय कामगिरी करून इतिहास रचला आहे. 100 तासांच्या अभूतपूर्व वेळेत 100 किलोमीटर अंतरावर बिटुमिनस काँक्रीटीकरण केले आहे. ही कामगिरी भारताच्या रस्ते पायाभूत सुविधा उद्योगाचे समर्पण आणि कल्पकता अधोरेखित करते. क्यूब हायवेज, एल अँड टी आणि गाझियाबाद – अलिगड एक्सप्रेसवे प्रायव्हेट लिमिटेड (जीएईपीएल) या सर्व कंपन्यांचे त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मी अभिनंदन करतो, असे ट्विट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.Another Record: 100 Lane Km of Bituminous Concrete laid in a record-breaking 100 hours at the Ghaziabad-Aligarh Expressway



NH34 चा गाझियाबाद – अलिगढ द्रुतगती मार्ग 118 किलोमीटरचा आहे. तो गाझियाबाद आणि अलिगड या दाट लोकवस्तीच्या प्रदेशांमधील वाहतूक दुवा म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. हा मार्ग दादरी, गौतम बुद्ध नगर, सिकंदराबाद, बुलंदशहर आणि खुर्जासह उत्तर प्रदेशातील विविध शहरांमधून जातो. हा एक महत्त्वपूर्ण व्यापारी मार्ग आहे. तो वस्तूंची वाहतूक सुलभ करून आणि औद्योगिक क्षेत्रे, कृषी क्षेत्रे आणि शैक्षणिक संस्थांना जोडून प्रादेशिक आर्थिक विकासात योगदान देतो.

काम दीर्घकाळ टिकणारे आणि किफायतशीर किमतीत करण्यासाठी या रस्ते प्रकल्पात कोल्ड सेंट्रल प्लांट रीसायकलिंग (CCPR) तंत्रज्ञानाचा वापर केला. या नाविन्यपूर्ण हरित तंत्रज्ञानामध्ये 90% मिल्ड मटेरियल वापरले. ते रस्त्याच्या पृष्ठभागाच्या सुमारे 20 लाख चौरस मीटर इतके आहे. परिणामी, व्हर्जिन सामग्रीचा वापर केवळ 10% इतका कमी झाला आहे. या दृष्टिकोनाचा अवलंब करून, आम्ही इंधनाचा वापर आणि संबंधित हरितगृह वायू उत्सर्जनात लक्षणीय घट केली आहे, ज्यामुळे आमचा कार्बन फूटप्रिंट कमी करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगतीपथावर वाटचाल करत असताना प्रत्येक प्रवाशाला गतिशीलता देणे त्याद्वारे वाणिज्य आणि आर्थिक गतिविधिला चालना देण्यासाठी, गुणवत्तेशी तडजोड न करता जलद गतीने जागतिक दर्जाचे महामार्ग विकसित करून या प्रदेशात आर्थिक विकास साधणे यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

Another Record: 100 Lane Km of Bituminous Concrete laid in a record-breaking 100 hours at the Ghaziabad-Aligarh Expressway

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub