जम्मू- काश्मी रमध्ये ड्रोन हल्ल्याचा आणखी एक कट लष्कराने उधळला

विशेष प्रतिनिधी

जम्मू : जम्मू- काश्मीररमध्ये रतनूचक- कालूचक येथील लष्करी तळावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा कट लष्कराने उधळून लावला. हे ड्रोन भारतीय हद्दीमध्ये येताच जवानांनी त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केल्यानंतर ते अंधारामध्ये अदृश्यव झाले. Another drone strike foiled in Jammu and Kashmir



दहशतवाद्यांनी दोनच दिवसांपूर्वी क्वाडकॉप्टरचा वापर करत भारतीय लष्करी तळांवर हल्ला केला होता. रविवारी रात्री ११.४५ च्या सुमारास पहिले ड्रोन आढळून आल्यानंतर पहाटे २.४० च्या सुमारास दुसरे ड्रोन भारतीय लष्करी तळावर घिरट्या घालताना दिसले. या ड्रोन्सना पाडण्यासाठी जवानांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला होता. याआधी २००२ मध्ये येथील लष्करी तळावर झालेल्या भीषण हल्ल्यामध्ये ३१ जण मरण पावले होते.

दरम्यान जम्मूच्या हवाईतळावर शनिवारी रात्री झालेल्या हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि स्थानिक पोलिस करत आहेत. या हल्ल्यामध्ये आयईडीचा वापर झाला असावा असा संशय तपास संस्थांना आहे. जम्मूच्या हवाई तळावर काउंटर ड्रोन टीम आणि एनएसजीचे कमांडो देखील तैनात करण्यात आले आहेत.

Another drone strike foiled in Jammu and Kashmir

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात