रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आणखी एका कंपनीची खरेदी : शुभलक्ष्मी पॉलिस्टर्सचे केले अधिग्रहण, 1,592 कोटींमध्ये झाली डील

वृत्तसंस्था

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स पेट्रोलियम रिटेलने शनिवारी शुभलक्ष्मी पॉलिस्टर्स (SPL) आणि शुभलक्ष्मी पॉलिटेक्स (SPTex) विकत घेतले. रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स पेट्रोलियम रिटेलने SPL आणि SPTex चा पॉलिस्टर व्यवसाय अनुक्रमे 1,522 कोटी आणि 70 कोटी रुपयांना विकत घेतला आहे.Another company bought by Reliance Industries Shubhalakshmi Polyesters acquired, deal sealed for Rs 1,592 crore

हा करार कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) आणि SPL-SPTex च्या संबंधित कर्जदारांच्या मान्यतेच्या अधीन आहे. SPL ची दरवर्षी सुमारे 2,52,000MT पॉलिमर तयार करण्याची क्षमता आहे. याशिवाय, SPL पॉलिस्टर फायबर, सूत आणि कापड ग्रेड चिप्स देखील तयार करते.



कंपनीला पॉलिस्टर व्यवसायात वाढ करायची आहे

SPL चे दाहेज (गुजरात) आणि सिल्वासा (दादरा आणि नगर हवेली) येथे 2 उत्पादन युनिट आहेत. याशिवाय SPTex चे देखील दाहेज येथे उत्पादन युनिट आहे, जेथे टेक्सच्युराइज्ड धाग्याचे उत्पादन केले जाते. रिलायन्स पेट्रोलियम रिटेल त्यांच्या डाउनस्ट्रीम पॉलिस्टर व्यवसायात वाढ करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून हे अधिग्रहण करत आहे.

2021 मध्ये SPL ची उलाढाल 1768 कोटी रुपये होती

2019, 2020 आणि 2021 या आर्थिक वर्षांमध्ये SPL ची उलाढाल 2702.50 कोटी, 2249.08 कोटी आणि रु. 1768.39 कोटी होती. त्याच कालावधीत SPTex ची उलाढाल रु. 337.02 कोटी, रु. 338.00 कोटी आणि रु. 267.40 कोटी होती.

Another company bought by Reliance Industries Shubhalakshmi Polyesters acquired, deal sealed for Rs 1,592 crore

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात