वृत्तसंस्था
कराची : Karachi airport पाकिस्तानातील कराची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ रविवारी मध्यरात्री भीषण बॉम्बस्फोट झाला. त्यात दोघांचा मृत्यू झाला असून, ११ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोटामुळे आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत होते. कराचीच्या उत्तर भागातील नाजिमाबाद, द्वितीय चुंदरीगर रोड व करीमाबाद या भागापर्यंत स्फोटाचे आवाज गेले.Karachi airport
हा भाग भूकंपासारखा हादरला. सिंध प्रांताचे गृहमंत्री यांनी सांगितले की, विदेशी नागरिकांच्या वाहनांवर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा स्फोट आयईडी बॉम्बचा असावा, असा संशय आहे. दरम्यान, मृतांमध्ये चीनमधून आलेल्या दोन नागरिकांचा समावेश असल्याची पुष्टी रात्री उशिरा झाली. पाकिस्तानात बंदी घालण्यात आलेल्या बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
चीनमधून आलेले इंजिनिअर व गुंतवणूकदार यांच्या वाहन ताफ्यावर बॉम्बस्फोट केल्याचे त्यांनी सोशल मीडियावरून जाहीर केले आहे. या वाहनांतील ११ गंभीर जखमींना जिन्हा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App