विशेष प्रतिनिधी
रायपूर : नुकताच रायपूरच्या SP असणाऱ्या आयपीएस अधिकारी अंकिता शर्मा यांची बस्तर जिल्ह्याचे ASP या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. छत्तीसगडमधील भूपेश बघेल सरकारने ही नियुक्ती केली आहे. छत्तीसगडच्या त्या पहिल्यावहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत आणि नक्षल ऑपरेशनची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांची सोशल मिडीयावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. कारण बस्तरमध्ये पहिल्यांदाच नक्षल ऑपरेशनची कमान एका महिला आयपीएस अधिकाऱ्यांकडे आली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .
Ankita Sharma: Who is this women IPS officer who is catching Naxals and taking action against them bravely?
तर कोण आहेत या अंकिता शर्मा?
अंकिता शर्मा यांचा जन्म 25 जून 1990 रोजी झाला. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला हाेता. त्यांचे वडील राकेश शर्मा हे व्यावसायाने व्यापारी आहेत तर आई सविता गृहिणी आहे. त्यांना 3 बहिणी आहेत. त्यांना घोडेस्वारी आणि बॅडमिंटनची प्रचंड आवड आहे.
2018 बॅचच्या त्या आयपीएस अधिकारी आहेत. अंकिता शर्मा यांनी यूपीएससीची परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना मोफत ऑनलाइन कोचिंग देखील सुरू केले होते. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या होत्या. 2018 च्या यूपीएससी परीक्षेमध्ये अंकिता शर्मा यांचा रँक होता 203. त्यांनी तिसऱ्याच अटेम्प्टमध्ये हे यश मिळवले होते.
वरिष्ठ IPS अधिकारी सत्य नारायण प्रधान यांची NCBच्या महासंचालकपदी नियुक्ती, 2024 पर्यंत राहणार पदावर
त्यांनी बऱ्याच गोष्टींमध्ये रेकॉर्ड स्थापन केलेले आहेत. नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्यातील ASP बनणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे छत्तीसगढच्या प्रशासकीय विभागांमध्ये काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी देखील आहेत.
प्रजासत्ताक दिनादिवशी रायपूरमध्ये परेडचे त्यांनी नेतृत्व केले होते. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी परेडचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी आहेत. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी छत्तीसगड प्रशासनामध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आजवर त्यांनी बऱ्याच नक्षलवाद्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यामध्ये यश मिळवले आहे. सोशल मीडियावर ट्रेंड होणार्या अंकिता शर्मा यांचे कौतुक अभिनेत्री रवीना टंडन हिने देखील केलेली आहे. नुकताच अभिनेत्री रविना टंडनची अरण्यक ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरिजमध्ये त्यांनी महिला पोलिस अधिकाऱ्याचा रोल निभावला होता. अंकिता शर्मा यांच्या या कामगिरीमुळे त्यांनी अंकिताचे कौतुक केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App