2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्याच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने गुरुवारी राजीनामा दिला. 24 मंत्र्यांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. जगन मोहन संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्याच्या तयारीत आहेत.Andhra’s entire cabinet resigns 24 ministers submit their resignations to Chief Minister Jaganmohan, new cabinet likely to be formed on April 11
वृत्तसंस्था
अमरावती : 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्याच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने गुरुवारी राजीनामा दिला. 24 मंत्र्यांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. जगन मोहन संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळात एक-दोन जुन्या चेहऱ्यांनाच स्थान दिले जाणार आहे.
2019 च्या निवडणुकीत प्रचंड विजय मिळविल्यानंतर, जगन रेड्डी यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या अर्ध्या कालावधीत संपूर्णपणे नवीन संघ निवडण्याची घोषणा केली असता हा बदल होण्याची दाट शक्यता होती. मंत्रिमंडळातील हा फेरबदल गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच होणार होता, मात्र कोरोनामुळे तो पुढे ढकलावा लागला होता.
9 एप्रिल रोजी नवीन मंत्रिमंडळाची शपथ
मुख्यमंत्री जगन यांनी काल संध्याकाळी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची भेट घेऊन त्यांना मंत्रिमंडळातील बदलांची माहिती दिली. लवकरच ते राज्यपालांची भेट घेऊन नव्या मंत्र्यांची यादी सादर करतील, अशी शक्यता आहे. 11 एप्रिल रोजी नवीन मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
26 नवीन जिल्ह्यांतील मंत्र्यांची निवड
दोन तास चाललेल्या बैठकीनंतर मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. मंत्रिपद केवळ अडीच वर्षांसाठी असेल, असे जबाबदारी सोपवितानाच सांगण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले. आता 26 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर प्रत्येक जिल्ह्यातील एका मंत्र्याला मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. प्रत्येक जाती, प्रांत, धर्मातील स्त्री-पुरुषांना स्थान दिले जाईल.
जून 2019 मध्ये जगन मोहन यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा मंत्रिमंडळातही असाच समतोल निर्माण झाला होता. जगन मोहन यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय, कापू आणि मुस्लिम समुदायातून एकूण 5 उपमुख्यमंत्री निवडले होते. मंत्रिमंडळात तीन महिलांचा समावेश करण्यात आला. त्यापैकी गृहमंत्री एम. सुचरिता हे दलित समाजातील होते. तेच समीकरण पुन्हा तयार होऊ शकते.
पक्षात नवीन जबाबदारी स्वीकारणार
एका मंत्र्याने सांगितले की, मंत्र्यांना हटवण्याचा अर्थ खराब कामगिरी होत नाही. यातील बहुतेकांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, हे मंत्र्यांना माहीत आहे. त्यांना पक्षीय भूमिका दिली जाण्याची शक्यता आहे. मंत्री असताना त्यांनी जो समन्वय साधला आहे, त्याचा उपयोग जिल्ह्यांमधील समन्वयासाठी केला जाणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App