वृत्तसंस्था
हैदराबाद : सीबीआयने रविवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे काका वायएस भास्कर रेड्डी यांना अटक केली. माजी खासदार विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. विवेकानंद रेड्डी हे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे भाऊ आणि विद्यमान मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे काका होते. 15 मार्च 2019 रोजी पुलिवेंडुला भागातील त्यांच्या घरी ते मृतावस्थेत आढळून आले होते.Andhra Pradesh Chief Minister Jaganmohan Reddy’s uncle arrested by CBI, accused of killing former MP
एसआयटीने प्रथम या प्रकरणाचा तपास केला आणि जुलै 2020 मध्ये त्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, विवेकानंद रेड्डी स्वतःसाठी किंवा जगन मोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला किंवा जगनची आई वायएस विजयम्मा यांच्यासाठी कडप्पा लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागत होते.
गेल्या 48 तासांत सीबीआयने या प्रकरणात दुसरी अटक केली आहे. यापूर्वी कडप्पाचे खासदार वायएस अविनाश रेड्डी यांनाही सीबीआयने शुक्रवारी अटक केली होती. आज सकाळी सीबीआयचे पथक वायएस भास्कर रेड्डी यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले. यानंतर अटकेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आले.
भास्कर रेड्डी यांना अटक केल्यानंतर त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने घराबाहेर जमले. सीबीआयच्या पथकाने भास्कर रेड्डी यांची यापूर्वीही अनेकदा चौकशी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश रेड्डी हे भास्कर रेड्डी यांनी अविनाश रेड्डी यांच्या नामांकनाला विरोध केल्याने नाराज होते. सीबीआयचा दावा आहे की, या लोकांनी हत्येसाठी 40 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण हैदराबाद सीबीआयला कोर्टाकडे पाठवण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App