विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रातील कोल्हापूरचे जावई आहेत हे अनेकांना माहित नसेल. पण एका कार्यक्रमात त्यांनीच हे सांगितले. नवी दिल्लीत विद्रोही या उडिया टीव्ही मालिकेच्या अभिनेत्रीने आपण कोल्हापूरच्या आहोत असे सांगितले. त्यावर अमित शाह म्हणाले, अरे वा! तू कोल्हापूरची म्हणजे सासरवाडीचीच की.And Amit Shah said to the actress, you are from Kolhapur, that is my in-laws place
उडिया स्वातंत्र्यसैनिक बक्षी जगबंधू यांच्या जीवनावर आधारित विद्रोही या दूरचित्रवाणी मालिकेच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या स्पेशल स्क्रिनींगच्या वेळी शाह यांनी मालिकेतील कलाकारांशी संवादही साधला.
यावेळी या मालिकेतील प्रमुख अभिनेत्रींपैकी एक हेमल इंगळे हिने आपली ओळख करून दिली. अमित शहांनी तिला विचारले की ती कुठली आहे? हेमल इंगळे कोल्हापूर म्हटल्यावर शाह म्हणाले, अरे वा! माझी सासरवाडी कोल्हापूरची आहेत. त्यांनी निर्मात्यांना सल्ला दिला की अशा आणखी चित्रपट आणि मालिका अज्ञात नायकांवर बनवल्या पाहिजेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App