बंगाल शिक्षक भरती घोटाळा : संतप्त महिलेने पार्थ चटर्जींना मारली चप्पल फेकून!!


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळ्यात अडकलेले ममता बॅनर्जी यांचे माजी मंत्री पार्थ चटर्जी यांच्यावर आज एका संतप्त महिलेने चप्पल फेकून मारली. जनतेने कष्टाने मिळवलेला पैसा त्याने लुटला आहे आणि त्याला एसी कारमधून हॉस्पिटलमध्ये आणले जात आहे. याची लाज वाटली पाहिजे असे म्हणत या महिलेने आपल्या पायातली चप्पल काढून महाराष्ट्र चटर्जी यांना एकूण मारली. An angry woman hit Partha Chatterjee by throwing a slipper

पार्थ चटर्जीला व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे पाहून माझा संताप झाला आणि मी त्याला चप्पल फेकून मारली. ती त्याच्या डोक्यात बसली असती तर मला जास्त आनंद झाला असता, असे या महिलेने नंतर पत्रकारांना सांगितले. शुभ्रा गौरी असे त्या महिलेचे नाव असून ती 24 परगणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. ही महिला कोलकत्याच्या ईएसआय हॉस्पिटलमध्ये औषध घेण्यासाठी रांगेत उभी होती. त्याचवेळी पार्थ चटर्जी यांना वैद्यकीय तपासणीसाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी तेथे आणले होते.

त्यांना ही व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट मिळते आहे हे बघून शुभ्रा गौरी प्रचंड संतापली आणि तिने पायातली चप्पल काढून त्यांच्या दिशेने फेकली. तिला पार्थ चटर्जीच्या डोक्यावरच चप्पल मारायची होती. परंतु ती त्यांच्या कारच्या मागच्या भागाला लागली. परिसरात थोडे धावपळ उडाली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पार्थ चटर्जी यांना ताबड ताबडतोब घटनास्थळापासून बाजूला नेले.

परंतु, शुभ्रा गौरी हिने पार्थ चटर्जी यांना चप्पल फेकून मारल्याचा संबंधित व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर जनतेने कष्टाने मिळवलेल्या पैसा त्याने लुटला त्याच्या डोक्यावर चप्पल बसायला हवी होती मग मला आनंद झाला असता, असे पत्रकारांना सांगून ती महिला अनवाणी पायाने हॉस्पिटल मधून बाहेर निघून गेली. तिचा अनवाणी चालण्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर बाहेर होत आहे.

An angry woman hit Partha Chatterjee by throwing a slipper

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात