प्रतिनिधी
मुंबई : “तेरा साया साथ होगा” या लतादीदींच्या प्रसिद्ध गीताचा आधार घेत अटर्ली बटर्ली डिलिशियस अमूलने लतादीदींना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. लतादीदींचे अमूल गर्लच्या रूपातली अर्कचित्रे सादर करून अमूलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही श्रद्धांजली अर्पण केली आहे. amul tribute to lata mangeshkar
देशातल्या ताज्या घडामोडींवर अर्कचित्रे सादर करून आपली अनोखी जाहिरात करण्याची अमूलची फार पूर्वी पासूनची पद्धत आहे. जेव्हा देशात मोठ्या घडामोडी घडतात अथवा महान व्यक्तींचे निधन होते तेव्हा अमूल त्यांच्या अमूल बॉय आणि अमूल गर्ल या रूपातली अर्कचित्रे सादर करून या घडामोडींचा परामर्श घेत असतात अथवा महान व्यक्तींना श्रद्धांजली वाहत असतात.
Lata Mangeshkar : कोल्हापुरातील याच घरात गेलं लतादीदींचं बालपण, मंगेशकर कुटुंबीय १० वर्षे राहिले
हीच परंपरा लतादीदींच्या निधनानंतर अमूलने पुढे नेली आहे. लतादीदी तंबोऱ्यावर रियाज करताना आणि लतादीदी स्टेजवर गाणे गाताना अशी त्यांची अमूल गर्लचा रूपातली अर्कचित्रे सादर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App