वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतातल्या सगळ्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठा हिंदुत्ववादी नेता होण्याची स्पर्धा लागली आहे, असा टोला एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आणि दिल्ली महापालिका निवडणुका या वर्षभूमीवर ओवैसी यांनी सगळ्या नेत्यांमध्ये हिंदुत्ववादाची ही स्पर्धा लागली आहे, असे म्हटले आहे. Among all the leaders, the competition is to become a bigger Hindutva leader than Modi
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेत ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये जातात. पूजा अर्चा करतात. जय सियाराम म्हणतात. आपण हिंदू असल्याचे सांगतात, तर दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील आपण हिंदू आणि हिंदुत्ववादी असल्याचे वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये सांगतात. याचा अर्थ देशवासीयांनी काय समजायचा?? हे नेते देशाची राज्यघटना मानत नाहीत का?? त्यांना देशात नेमका कोणता संदेश द्यायचा आहे??, असे सवाल ओवेसी यांनी केले.
त्याचवेळी ओवैसी यांनी खरं म्हणजे देशातल्या सगळ्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेक्षा मोठा हिंदुत्ववादी नेता होण्याची स्पर्धा लागली आहे. कारण यापैकी कोणत्याही नेत्याला देश संविधानानुसार चालवायचाच नाही, असा आरोप ओवैसी यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App