विशेष प्रतिनिधी
मुंबई : कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चार वर्षांपूर्वी तत्कालिन भारतीय जनता पक्षाकडून फोन टॅपींग झाले होते, असा आरोप केला आहे. महाविकास आघाडीनेही त्याची लगेच दखल घेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.’Amjad Khan’ Nana Patole accused of phone tapping four years ago, government orders high-level inquiry
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळात फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला. 2016-17 मध्ये राज्यातील आमदार खासदारांचे फोन टॅप करण्यात आले होते.
समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आले. यासाठी माझा फोन नंबर अमजद खान नावाने टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी सभागृहात केली.
त्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले, आगामी अधिवेशनापर्यंत या प्रकरणाची चौकशी करण्यास त्यांनी सांगितले आहे.
पटोले म्हणाले, अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे दाखवून माझा फोन टॅप करण्यात आला. नंबर माझा आणि अमजद खान असे मुस्लीम नाव ठेवण्यात आले. मुस्लीम धर्माचे नाव देऊन हिंदू मुस्लिम वाद निर्माण करुन राजकारण करायचे होते काय? माझ्यासह इतर काही लोकप्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात आले.
अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. लोकप्रतिनिधींना सार्वजनिक जीवनातून बरबाद करण्याचे काम करण्याचा हा प्रयत्न आहे.
सभागृहातच अनिल देशमुख करु, भुजबळ करू, अशा धमक्या दिला जात आहेत हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आह.शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरली.
यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. फोन टॅपिंग करणे हा गंभीर प्रकार असून अशा प्रकरणात रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु तशी प्रक्रिया या प्रकरणात पार पाडल्याचे दिसत नाही.
याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. उद्याच या प्रकरणी उच्च अधिकाºयांचीची बैठक घेऊन माहितीही घेऊ, असे वळसे पाटील यांनी सभागृहाला सांगितले.
हत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App