विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी – आसाम आणि मिझोराममधील तणाव निवळण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच्या राज्यांतील नेत्यांविरोधात दाखल केलेले ‘एफआयआर’ मागे घेण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याकामी पुढाकार घेत आज आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आणि मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांच्याशी चर्चा केली. Amit shahs efforts fruitfulled
दोन्ही राज्यांचे पोलिस आणि नागरिकांमध्ये संघर्ष होऊन त्यात आसामच्या पाच पोलिस आणि एका नागरिकांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तणाव कमी करण्याच्या सूचना दोन्ही राज्यांना दिल्या होत्या.
यामुळे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी मिझोरामचे खासदार के. वनलालवेणा यांच्याविरोधात आसाम पोलिसांनी नोंदविलेला ‘एफआयआर’ मागे घेण्याचे आदेश दिले. यानंतर मिझोराम सरकारनेही सरमा यांच्याविरोधात दाखल केलेला ‘एफआयआर’ मागे घेतला. सीमावाद चर्चेच्या माध्यमातूनच सोडविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App