नवी दिल्ली : छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित बीजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले. सुरक्षा दलाला बेपत्ता झालेल्या 17 जवानांचे मृतदेह सापडले आहेत.Amit Shah’s Assam tour canceled after Naxal attack in Chhattisgarh
या हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आसामचा दौरा रद्द केलाय. अमित शाह हे आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार दौऱ्यावर होते. आज शाह यांच्या 3 प्रचार रॅली होणार होत्या पण त्यातील एकच रॅली पार पडली. त्यानंतर पुढील कार्यक्रम रद्द करुन शाह दिल्लीला परतले आहेत.
शनिवारी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील जोनागुडा गावात हा नक्षलवादी हल्ला झाला. त्यावेळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये मोठी चकमक झाली.
त्यावेळी 5 जवान शहीद झाले तर 30 जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. तर 18 अन्य जवान बेपत्ता असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आज 17 जवानांचे मृतदेह मिळून आले आहेत. त्यामुळे नक्षलवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या शहीदांची संख्या 22 झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी आसामचा दौरा रद्द केलाय.
या हल्ल्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी शाह दिल्लीला परतले आहेत.
My thoughts are with the families of those martyred while fighting Maoists in Chhattisgarh. The sacrifices of the brave martyrs will never be forgotten. May the injured recover at the earliest. — Narendra Modi (@narendramodi) April 3, 2021
My thoughts are with the families of those martyred while fighting Maoists in Chhattisgarh. The sacrifices of the brave martyrs will never be forgotten. May the injured recover at the earliest.
— Narendra Modi (@narendramodi) April 3, 2021
मोदींचं ट्विट
या घटनेनंतर डीजी सीआरपीएफ कुलदीप सिंग हे छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. घटनेची माहिती घेण्यासाठी ते छत्तीसगडला जाणार आहेत. गृहमंत्रालयाने डीजींना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या घटनेत पाच जवान शहीद झाल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे.
छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. शहीद जवानांना देश कधीच विसरणार नाही, असं मोदींनी म्हटलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App