विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील दोन मंत्र्यांसह अकरा आमदारांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. आता केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शाह या दोघांच्या प्रभावक्षेत्रात लक्ष घालणार आहेत.Amit Shah will now focus on the sphere of influence of BJP minister Swami Prasad Maurya and Dara Singh
अमित शाह २३ जानेवारीनंतर निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. ज्याठिकाणी स्वामी प्रसाद मौर्य आणि दारा सिंह यांच्यासारख्या नेत्यांचा प्रभाव आहे त्या विधानसभेवर जास्त लक्ष केंद्रीतकरणार आहेत. या भाजपा नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या काळात पक्षाची साथ सोडत समाजवादी पक्षात प्रवेश घेतला. त्यामुळे भाजपाला काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक आयोगाकडून सध्या कुठल्याही प्रकारची रॅली अथवा रोड शो ला परवानगी नाही. परंतु भाजपानं यासाठीही प्लॅन बी तयार ठेवला आहे. जर मोठ्या रॅलीला परवानगी नसेल तर छोट्या छोट्या रॅली काढल्या जातील. इतकचं नाही तर अमित शाह उत्तर प्रदेश आयोगाच्या निदेर्शानुसार इनडोअर रॅली काढण्याच्या तयारीत आहेत.
परंतु कोरोना प्रोटोकॉल आणि निवडणूक आयोगाचे निर्देश यांचे पालन करतच अमित शाह त्यांचा दौरा पूर्ण करणार आहेत.पक्षातून बाहेर पडणाºया नेत्यांमुळे पक्षाला नुकसान होणार नाही असेही म्हटले जात आहे. कारण मागील ५ वर्षात भाजपानं पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांप्रमाणे इतर नेतृत्व तयार करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळेच नाराज होत स्वामी प्रसाद मौर्य आणि दारा सिंह चौहान यासारख्या नेत्यांना अडचण झाली.
भाजपाच्या मते, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील वातावरणावरुन भाजपा मागील वेळसारखं या दोन्ही टप्प्यात ८३ हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळेच विजयाचा आकडा यंदा ३०० हून अधिक जाईल असे म्हटले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more