पुढील वर्षी १५ नोव्हेंबर हा दिवस देशात आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Amit Shah भगवान बिरसा मुंडा हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान नायकांपैकी एक होते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सांगितले. आदिवासी गौरव दिनानिमित्त नवी दिल्लीच्या बनसेरा पार्कमध्ये बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर गृहमंत्री म्हणाले की, आदिवासी समाज भगवान बिरसा मुंडा यांचा सदैव ऋणी राहील. पुढील वर्षी १५ नोव्हेंबर हा दिवस देशात आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.Amit Shah
बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा यांनी लहान वयातच राष्ट्र आणि आदिवासी लोकांच्या उन्नतीसाठी आपले जीवन समर्पित केले होते. ते म्हणाले की, आदिवासी समाजासाठी जल, जमीन आणि जंगले अत्यंत आवश्यक आहेत आणि बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजात याबाबत जनजागृती केली.
अमित शाह यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आलेल्या बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे वजन सुमारे 3 हजार किलो आहे. पश्चिम बंगालमधील दोन कारागिरांनी ही मूर्ती तयार केली आहे. आजच केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सराय काले खान ISBT चौकाचे नाव बदलून भगवान बिरसा मुंडा चौक करण्याची घोषणा केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App