Amit Shah दिल्लीत भाजप सरकारने यमुना नदी साफ केल्यावर केजरीवालांनी त्यात डुबकी मारावी; अमित शाहांचे निमंत्रण!!

Amit Shah

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीत भाजपचे सरकार आल्यानंतर तीन वर्षाच्या आत मध्ये यमुना रिव्हर फ्रंट बनवू. यमुना नदी साफ करू. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी परिवारासहित येऊन यमुनेत डुबकी मारावी, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केजरीवाल यांना हाणला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने संकल्प पत्र जारी केले. त्याचे प्रकाशन अमित शाह यांच्या हस्ते केले. त्यावेळी केलेल्या भाषणात अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल यांना टोला हाणला. केजरीवाल गेल्या 10 वर्षांत यमुना नदी साफ करू शकले नाहीत. पण भाजपचे सरकार दिल्लीमध्ये आल्यानंतर साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर यमुना रिव्हर फ्रंट विकसित करू. यमुना नदी साफ करू. हरियाणा आणि उत्तर प्रदेश या दोन्ही सरकारांच्या मदतीने महाभारत कॉरिडॉर बनवू. त्यानंतर केजरीवाल यांनी आपल्या परिवारासह येऊन यमुनेमध्ये डुबकी मारावी. मी त्यांना निमंत्रण देतो, असे अमित शाह म्हणाले.

भाजपने आपल्या संकल्प पत्रात महाभारत कॉरिडॉर यमुना रिव्हर फ्रंट ही आश्वासने तर दिली आहेतच, पण त्याचबरोबर वृद्धांना 5 लाखांपेक्षा अधिकचे उपचार मोफत, फ्री ओपीडी, दिल्लीतल्या 1700 अनधिकृत कॉलनी मधल्या नागरिकांना निवासस्थानाचे अधिकार दिल्लीतल्या 50 हजार युवकांना सरकारी नोकऱ्या तसेच 20 लाख स्वयंरोजगार निर्मिती, इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम त्यासाठी 20 हजार कोटींची तरतूद अशी आश्वासने दिली आहेत.

Amit Shah says, “To promote tourism, Mahabharat Corridor will be constructed with the cooperation of Haryana and UP governments.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात