विशेष प्रतिनिधी
सांगली : Vishwajit Kadam विधानसभा निवडणूकी नंतर आत्मपरीक्षणाची गरज आहे, असे म्हणत काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. एखाद्या व्यक्तीने राजीनामा दिल्यानंतर पक्षश्रेष्ठी त्याबाबत निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले.Vishwajit Kadam
प्रदेशाध्यक्ष पदाबाबत काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असेही विश्वजीत कदम यांनी सांगितले. स्वबळावर निवडणुका लढविण्याचे सूतोवाच करताना कदम म्हणाले, – सुप्रीम कोर्टात अजून निवडणुकी बाबत काही विषय पेडींग आहे. त्यामुळे मला वाटत नाही पुढील चार पाच महिने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका लागतील. पण कार्यकर्त्यांना बळ देण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्था समिती जिल्हापरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका निवडणूका महत्त्वाच्या असतात
कदम म्हणाले,महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रमुख सहा पक्ष आणि इतर काही पक्ष कार्यरत आहेत. म्हणून कार्यकर्त्यांसाठी या निवडणूकांमध्ये नेमकं महाविकास आघाडी म्हणून जायचं असेल तर या बाबात जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांना नेत्यांच्या भावना समजून घेऊन महाविकास आघाडीतील तीनही पक्षातील नेतृत्त्व येणाऱ्या काळात एकत्र लढायचं तो निर्णय घेतील.
प्रदेशाध्यक्ष पदाबाबत ते म्हणाले, हे निर्णय राज्यपातळीवरचे पक्षश्रेष्ठी घेतात. काँग्रेस पक्षासाठी महाराष्ट्र राज्य महत्वाचं आहे. महाराष्ट्रा सारख्या महत्त्वाच्या राज्याचा जो निर्णय असेल तो दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. अजुनही महाराष्ट्राचे का्ँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत . त्यामुळे त्यांच्याबाबत काही निर्णय होईल का याची मला कल्पना नाही. एखादी व्यक्ती त्या पदावर असतात त्या बाबतीत बोलणं मला उचित वाटत नाही
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App