विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकता सुधारणा कायदा अर्थात CAA लागू केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केली. अमित शाह यांच्या या घोषणेमुळे देशातले राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघणार आहे.Amit Shah says CAA will be implemented before 2024 Lok Sabha elections
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) अधिसूचित करून त्याची अंमलबजावणी केली जाईल. डिसेंबर 2019 मध्ये संसदेने हा कायदा मंजूर केला होता. “सीएए हा देशाचा कायदा आहे, तो निश्चितपणे अधिसूचित केला जाईल. तो निवडणुकीपूर्वी सूचित केला जाईल. त्या विषयी कोणताही गोंधळ नसावा, असे अमि शाह यांनी दिल्लीतील ईटी नाऊ-ग्लोबल बिझनेस समिटमध्ये बोलताना सांगितले.
मुळातच सीएए लागू करणे हे काँग्रेस सरकारचे वचन होते. जेव्हा देशाची फाळणी झाली आणि त्या देशांमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले, तेव्हा काँग्रेसने निर्वासितांचे भारतात स्वागत आहे आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. पण आता मात्र काँग्रेसचे नेते आपल्याच राजकीय पूर्वजांनी दिलेल्या वचनापासून मागे हटत आहेत, असा आरोप अमित शाह यांनी केला. CAA हा नागरिकत्व देण्यासाठी कायदा आणला आहे. कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही, असा स्पष्ट निर्वाळाही त्यांनी दिला.
हिंदू, शीख, जैन स्थलांतरितांसाठी कायदा
आपल्या देशातील अल्पसंख्याकांना आणि विशेषत: आपल्या मुस्लिम समुदायाला चिथावणी दिली जात आहे. CAA कोणाचेही नागरिकत्व हिसकावून घेऊ शकत नाही कारण कायद्यात तशी कोणतीही तरतूद नाही. CAA कायदा हा बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये छळलेल्या निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी कायदा आहे. नरेंद्र मोदी सरकारने लागू केलेल्या सीएएचा उद्देश बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून स्थलांतरित झालेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करणे आहे, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.
अमित शाह यांच्या या घोषणेमुळे देशातले राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघणार आहे काँग्रेसने आणि बाकीच्या विरोधी पक्षांनी सीएए कायदा सुरुवातीपासूनच विरोध केला आहे आणि आता तो प्रत्यक्ष लागू होताना ते त्यात अडथळा आणण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App