विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील सुरक्षा स्थितीचा आणि नव्याने उभ्या ठाकणाऱ्या आव्हानांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी आढावा घेतला. जागतिक दहशतवादी संघटनांचे धोके, सायबर क्षेत्राचा अवैध वापर आणि विदेशी दहशतवाद्यांच्या हालचाली आणि दहशतवादासाठी आर्थिक रसद यावर त्यांनी सुरक्षा आणि गुप्तचर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.Amit Shah reviewed the security situation in the country
केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातील सुरक्षा स्थिती आणि सुरक्षेच्या दृष्टीने नव्याने उभा ठाकणाऱ्या आव्हानांचा एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. या बैठकीत दहशतवाद, जागितक दहशतवादी संघटनाचे निरंतर धोके, दहशतवादाला आर्थिक रसद, अमलीपदार्थांच्या तस्करीसह दहशतवाद, संघटित गुन्हेगारी, सायबर क्षेत्रा अवैध वापर, विदेशी दहशतवाद्यांच्या हालचालीवर प्रकाश टाकण्यात आला.
सातत्याने बदलणाऱ्या दहशतवादी आणि सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी गृहमंत्र्यांनी केंद्र आणि राज्याच्या सुरक्षा संस्थेदरम्यान योग्य समन्वय आणि ताळमेळ राखण्यावर भर दिला. देशातील सुरक्षा संस्था, केंद्रीय गुप्तचर संस्था,
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, सशस्त्र दलाचे गुप्तचर विभाग, महसूल आणि वित्तीय गुप्तचर संस्थेचे प्रमुख बैठकीत सहभागी होते. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस प्रमुखही व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमातून सहभागी झाले
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App