
जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत गृहमंत्री अमित शाह
विशेष प्रतिनिधी
खुंटी : झारखंडमधील खुंटी येथे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, आज मणिशंकर अय्यर आम्हाला धमक्या देत आहेत, ते आम्हाला पाकिस्तानचा आदर करण्यास सांगत आहेत कारण त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे. अमित शाह म्हणाले की, काही दिवसांपूर्वी फारुख अब्दुल्ला यांनी पीओकेबाबत बोलू नका, कारण पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, असं विधान केलं होतं.
जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले, “आज मी INDI आघाडीच्या नेत्यांना सांगू इच्छितो की PoK भारताचे आहे आणि ते कोणीही आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. PoK भारतात विलीन करण्याबद्दल बोलण्याऐवजी काँग्रेस आम्हाला अण्वस्त्राच्या धमक्या देत आहे. पीओके हा भारताचा भाग आहे हे स्पष्ट आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पाकिस्तानमधून पीओके आणण्याऐवजी काँग्रेस अणुबॉम्बच्या चर्चा करून भारतातील लोकांना घाबरवत आहे. काँग्रेसला काय झाले माहीत नाही. पीओकेमधील प्रत्येक इंच जमीन भारताची आहे आणि ती भारतातच राहिली पाहिजे, अशी भाजपची भूमिका स्पष्ट आहे, असे शाह म्हणाले.
Amit Shah made a big statement about POK during the discussions of Pakistani nuclear bomb
महत्वाच्या बातम्या
- सुप्रीम कोर्टात केजरीवाल यांच्या जामिनाला ईडीचा विरोध; प्रचार हा मूलभूत अधिकार नाही
- PM मोदी-राहुल गांधींना जाहीर चर्चेचे आव्हान; 2 माजी न्यायमूर्ती आणि एका पत्रकाराने लिहिले पत्र
- महायुतीला पवारांनी महाराष्ट्रात 12 ते 13 जागा “दिल्या”; किती उदार अंत:करण साहेबांचे, म्हणत फडणवीसांनी उडवली खिल्ली!!
- सौरऊर्जा उत्पादनात भारत पोहचला तिसऱ्या स्थानावर, जपानला टाकलं मागे!