जाणून घ्या, नेमकी कुठं घडली घटना आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटावर मोठा हल्ला करताना दावा केला आहे, की १९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा त्यांचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक रॅलीत उपस्थित होता.1993 Mumbai blasts accused present at Thackeray groups rally Big accusation of BJP
या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या कृत्याची लाज वाटली पाहिजे, असे भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल करत उद्धव ठाकरेंना माफी मागण्यास सांगितले आहे. बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आले होते. याशिवाय औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा गौरव करण्याचा प्रयत्न झाला.
तसेच बावनकुळे म्हणाले की, आज मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करत आहे. आज बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला काय वाटत असेल? १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर बाळासाहेब ठाकरे यांनीच मुंबईचे रक्षण केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App