विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील एका रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला एक कोटीचा जॅकपॉट लागला आहे. त्याने सकाळी 270 रुपयांचं एक लॉटरीचं तिकीट खरेदकेले होते. त्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे.Ambulance driver wins jackpot, wins Rs 1 crore prize on Rs 270 ticket
पूर्वी वर्धमान जिल्ह्यात राहणारे शेख हीरा रुग्णवाहिकेचे चालक आहेत. काल सकाळी काही कामासाठी ते एका दुकानात गेले होते. तेथे त्यांनी 270 रुपयांच्या लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. यानंतर ते कामावर निघून गेले. दुपारी लॉटरीचा निकाल आला.
जे तिकीट शेख हीराने खरेदी केलं होतं, त्या नंबरवर 1 कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला आणि काही तासात ते कोट्यवधी झाले.यापूवीर्ही शेख यांनी अनेकदा लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं, मात्र त्यांना कधीच लॉटरी लागली नाही. ते केवळ जॅकपॉट लागल्याचं स्वप्नच पाहत होते.
शेख म्हणाले की, त्यांची आई गेल्या अनेक वर्षांपासून आजारी आहे, तिच्यावर उपचार सुरू आहे. आर्थिक चणचण असल्यामुळे मी तिच्या उपचारासाठी फार खर्च करू शकत नव्हतो.
आता इतके पैसे आल्यानंतर पहिल्यांदा आईवर उपचार करीन आणि त्यानंतर राहण्यासाठी चांगलं घर खरेदी करेन. सुरुवातील एक कोटींची लॉटरी लागल्यानंतर ते तिकीट हरवेल या भीतीने आधी पोलीस ठाण्यात गेले. यानंतर पोलिसांनी त्याला सुखरुप घरी पोहोचवलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App