वृत्तसंस्था
चंडीगढ : पंजाबच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताना कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर पाकिस्तान धार्जिणे असल्याचा आरोप केला. या आरोपावर चिडून जाऊन सिद्धूंचे सल्लागार समर्थक पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआय एजंट बरोबर शैय्यासोबत केल्याचा आरोप केला आहे.Amarinder lived in, slept with known ISI agent: ex-DGP-turned Sidhu adviser
या आरोपामुळे पंजाबच्या राजकारणात आणखीन खळबळ माजली असून कॅप्टन अमरिंदरसिंग आता मुस्तफा आरोपांना काय उत्तर देतात?, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कारण मुस्तफा यांनी आपल्याकडे अमरिंदर सिंग यांच्या विरोधात प्रचंड पुरावे असल्याचा दावा केला आहे.
पंजाबचे माजी पोलीस महासंचालक असलेले मोहम्मद मुस्तफा म्हणाले, की अमरिंदर सिंग हेच गेल्या पाच वर्षात स्वतः पंजाबला अवमानित करत होते. काँग्रेसच्या आमदारांचा त्यांना पाठिंबा नसताना ते दबावाने पंजाबवर राज्य करत होते. ते नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर पाकिस्तान धार्जिणे असल्याचा आरोप करतात.
पण प्रत्यक्षात त्यांनीच गेल्या बारा वर्षात पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच्या एजंट बरोबर अनेकदा शैय्यासोबत केली आहे. याचे भरपूर पुरावे आमच्याकडे आहेत. कॅप्टन अमरिंदरसिंग हे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत. त्यांनी मला माझे तोंड उघडायला लावू नये अन्यथा त्यांचे बरेच कारनामे उघड्यावर येतील, असा इशारा मोहम्मद मुस्तफा यांनी दिला आहे.
मोहम्मद मुस्तफा यांच्या आरोपांमुळे पंजाबच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजली असून नवज्योत सिंग सिद्धू यांच्या समर्थकाकडून प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर अमरिंदरसिंग यांच्यावर टीकेचा भडिमार होताना दिसतो आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना कॅप्टन अमरिंदरसिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू अशाप्रकारे एकमेकांवर तुटून पडले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App