Amar Jawan Jyoti:50 वर्षांपासून धगधगत असलेली अमर जवान ज्योती आज विझणार, जाणून घ्या इतिहास


देशाच्या राजधानीतील प्रसिद्ध इंडिया गेटवर ५० वर्षांपासून धगधगत असलेली अमर जवान ज्योती आज विझविली जाणार आहे. आता ती राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे प्रज्वलित केलेल्या ज्योतीमध्ये विलीन केली जाईल. ही ज्योत पाच दशकांपासून सतत धगधगत आहे. आज एका कार्यक्रमांतर्गत इंडिया गेटपासून सुमारे 400 मीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकात ती प्रज्वलित ज्योतीमध्ये विलीन केली जाईल. या निर्णयाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी विरोधही केला आहे. Amar Jawan Jyoti Immortal Jawan Jyoti which has been burning for 50 years will be extinguished today, know the history


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीतील प्रसिद्ध इंडिया गेटवर ५० वर्षांपासून धगधगत असलेली अमर जवान ज्योती आज विझविली जाणार आहे. आता ती राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे प्रज्वलित केलेल्या ज्योतीमध्ये विलीन केली जाईल. ही ज्योत पाच दशकांपासून सतत धगधगत आहे. आज एका कार्यक्रमांतर्गत इंडिया गेटपासून सुमारे 400 मीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकात ती प्रज्वलित ज्योतीमध्ये विलीन केली जाईल. या निर्णयाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी विरोधही केला आहे.

अमर जवान ज्योतीचा इतिहास

अमर जवान ज्योती दिल्लीच्या इंडिया गेटवर उभारलेली आहे. ज्यामध्ये संगमरवरी पृष्ठभागावर एक रायफल बंदूक उभी आहे आणि त्यावर सैनिकाचे हेल्मेट टांगलेले आहे. त्याचा इतिहास 50 वर्षांचा आहे. हे स्मारक 1971 मध्ये पाकिस्तानसोबतच्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बांधण्यात आले होते. 1972 मध्ये प्रजासत्ताकदिनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. 2006 पर्यंत ते LPG सिलिंडरने जळत होते. त्यानंतर नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आली.राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन करण्याचे कारण

दिल्लीचे राष्ट्रीय युद्ध स्मारक इंडिया गेटजवळ 40 एकरावर बांधले गेले आहे. इथे स्वतंत्र भारताच्या इतिहासात वेगवेगळ्या युद्धात आणि घटनांमध्ये शहीद झालेल्या २६ हजार सैनिकांची नावे लिहिली गेली आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये पीएम मोदींच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, आजपर्यंत शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जागा नव्हती, त्यामुळे अमर जवान ज्योतीला इंडिया गेटवर ठेवण्यात आले होते. आता नॅशनल वॉर मेमोरिअल बांधले गेल्याने ते तिथे नेण्यात येत आहे.

Amar Jawan Jyoti Immortal Jawan Jyoti which has been burning for 50 years will be extinguished today, know the history

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात