प्रतिनिधी
मुंबई : लव्ह जिहाद मधून श्रद्धा वालकरचे हत्याकांड करणाऱ्या आफताब अमीन पूनावाला याला कठोरातील कठोर शिक्षा द्याच पण श्रद्धाच्या भीषण हत्याकांडा मागे आफताबचा परिवार देखील आहे. त्यांचीही चौकशी आणि तपास करून त्यांना शिक्षा द्या, अशा शब्दांत श्रद्धा वालकर हिचे वडील विकास वालकर यांनी संताप व्यक्त केला आहे. Also give severe punishment to Aftab and his family who broke Shraddha’s 35 pieces
संपूर्ण देशाला श्रद्धा हत्याकांडाने हादरवून सोडले आहे. क्रुरकर्मा आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे करुन ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. श्रद्धा आफताबच्या लव्ह जिहादचा बळी ठरली. श्रद्धाच्या वडिलांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत, धर्म जागृतीवर भर दिला गेला पाहिजे. तसेच, आफताब अमीन पूनावाला आणि त्याच्या परिवारालाही कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी देखील केली.
जैसे मेरी बेटी की हत्या हुई है वैसे ही आफताब पूनवाला को भी उसी तरह का सबक मिलने की मैं उम्मीद करता हूं। आफताब के परिजनों, रिश्तेदारों व घटना में शामिल अन्य सभी के खिलाफ जांच होनी चाहिए: श्रद्धा वॉकर के पिता विकास वॉकर, मुबंई pic.twitter.com/b3x1W2a3zF — ANI_HindiNews (@AHindinews) December 9, 2022
जैसे मेरी बेटी की हत्या हुई है वैसे ही आफताब पूनवाला को भी उसी तरह का सबक मिलने की मैं उम्मीद करता हूं। आफताब के परिजनों, रिश्तेदारों व घटना में शामिल अन्य सभी के खिलाफ जांच होनी चाहिए: श्रद्धा वॉकर के पिता विकास वॉकर, मुबंई pic.twitter.com/b3x1W2a3zF
— ANI_HindiNews (@AHindinews) December 9, 2022
श्रद्धाचे वडील म्हणाले की, श्रद्धाच्या हत्येमुळे आम्हाला अत्यंत दु:ख झाले आहे. दिल्लीच्या पोलिसांनी आणि राज्यपालांनी श्रद्धाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मिळाले आहे. आतापर्यंत झालेल्या तपासाबाबत दिल्ली पोलीस आणि वसई पोलीस यांचे काम संयुक्तपणे व्यवस्थित चालले असून, अगदी सुरुवातीस वसई येथील तुळींज पोलीस स्टेशन आणि मणिपूर पोलीस स्टेशन यांच्या काही असहकार्याच्या भूमिकेमुळे मला बराच त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल चौकशी व्हावी, जर तसे झाले नसते तर, आज माझी मुलगी जिवंत असती, किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती, असे विकास वालकर यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App