कोरियन राजदूतासह सगळ्या दूतावासाला लावले नाटू नाटूने वेड; पंतप्रधान मोदींनी शेअर केला व्हिडिओ!!

 प्रतिनिधी

नवी दिल्ली : एस. एस. राजामौली यांच्या आर आर आर या सिनेमातील नाटू नाटू या सुप्रसिद्ध गाण्याला ऑस्कर 2023 चे बेस्ट ओरिजिनल साँग कॅटेगरी मध्ये नॉमिनेशन मिळाल्यापासून भारताला वेड लावणारे हे गाणे आता जगभरात तेवढेच लोकप्रिय झाले आहे. हे गाणे आणि त्यातील ओरिजनल डान्स स्टेप्स जगभरात गाजताना दिसत आहेत. All embassies, including the Korean ambassador, became obsessed with Natu Natu; PM Modi shared the video!!

भारतातील कोरियन दूतावासातील ambassador Chang Jea-bok यांनी embassy staff बरोबर नाटू नाटू या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर वर पोस्ट केला आहे. नाटू नाटू हे गाणे किती जगप्रसिध्द झाले आहे हे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे.

https://youtube.com/shorts/CeG3esyuMSg?feature=share

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या ट्विटमुळे कोरियन दूतावासातील डान्सचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला आहे. यातूनच बॉलिवूडला मागे टाकत हे तामिळ गाणे मोठ्यातल्या मोठ्या व्यक्ती पासून ते लहानातल्या लहान मुलांच्या मनाचा ठाव घेत आहे. 2023 ऑस्कर कडून मिळालेल्या या नॉमिनेशनमुळे भारतीय सिनेमाकडे आणि त्यातील गाण्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन तयार झाला आहे.

सिनेमातील सगळ्या गोष्टीत परफेक्शन लागणाऱ्या डायरेक्टर एस. एस. राजामौली, तसेच टॉलिवूडचे सुप्रसिद्ध कलाकार राम चरण, एनटीआर जूनियर आणि इतर सगळ्याच कलाकारांच्या कष्टाला उत्तम यश आले, असे म्हणावयास हवे. शिवाय नरेंद्र मोदी यांनी केलेले हे ट्विट भारतीय कलाकारांचा कलाक्षेत्रातही भारतीय आपला ठसा उत्तमरित्या उमटवू शकतात, असा कॉन्फिडन्स वाढवणारी ठरणार आहे.

All embassies, including the Korean ambassador, became obsessed with Natu Natu; PM Modi shared the video!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात