ALERT: Delta variant अमेरिकेसाठी धोक्याची घंटा ; डॉ. फाऊची यांचा दावा ; जाणून घ्या सविस्तर


B.1.617.2 याला डेल्टा व्हेरिएंट म्हणतात…तो भारतातच 2020 च्या ऑक्टोबरमध्ये सापडला. महाराष्ट्रातल्याच अमरावतीमधून तो सापडल्याचंही महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सने म्हटलंय. पण who ने त्याचं नाव Delta असं ठेवलं.


दोन व्हेरिएंटमधून E484Q आणि L452R असे म्युटेशन झाले, आणि त्यातून डेल्टा व्हेरिएंट तयार झाला. आता याच डेल्टा व्हेरिएंटचं पुढे म्युटेशन होऊन डेल्टा प्लस हा व्हेरिएंट तयार झाला आहे. ALERT: Delta variant alarm for US; Dr. Fauchi claims; Learn in detail


वृत्तसंस्था

नवी दिल्ली: कोरोनाच्या लढाईत सर्वात मोठा अडसर हा डेल्टा व्हेरिएंट ठरू शकतो अशी भीती डॉ. अँथनी फाऊची यांनी व्यक्त केली आहे.कोरोनाचा Delta variant हा अमेरिकेसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो असा दावा देखील त्यांनी केला आहे . डॉ. अँथनी फाऊची व्हाईट हाऊसचे वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार आहेत. जगभरात कोरोनाचा डेल्टा आणि डेल्टा प्लस हे व्हेरिएंट वेगाने पसरत आहेत.

कोरोनाबाबत व्हाईट हाऊसमध्ये ब्रीफिंग करत असताना डॉ. फाऊची यांनी अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचं प्रमाण 20 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. दोन आठवड्यांपूर्वी हे प्रमाण 10 टक्के होतं. ब्रिटनप्रमाणेच डेल्टा व्हेरिएंट अमेरिकेत कोरोना संपण्याच्या मार्गातला मोठा अडथळा ठरू शकतो. अमेरिकेत ज्या लसी दिल्या जात आहेत त्या डेल्टा व्हेरिएंटवर परिणामकारक ठरत आहेत ही बाब समाधानाची आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.



ब्रिटनमध्ये काही दिवसांपूर्वीच डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला. या व्हेरिएंटची देशात ९० टक्के प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळेच ब्रिटनमध्ये लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. डेल्टा व्हेरिएंट पसरण्याचं प्रमाण हे अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त आहे. अल्फा व्हेरिएंटमुळे जे रूग्ण बाधित होत आहेत त्या तुलनेत जे रूग्ण डेल्टा व्हेरिएंटने बाधित होत आहेत त्यांना जेव्हा रूग्णालयात दाखल करण्यात येतं आहे तेव्हा त्यांची अधिक काळजी घ्यावी लागते आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे रूग्णालयात जावं लागणाऱ्या रूग्णांचं प्रमाण वाढलं आहे आणि ही बाब नक्कीच चिंता वाढवणारी आहे .

अमेरिकेत आत्ता जी प्रकरणं दिसून येत आहेत त्यावर काटेकोर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटमुळे संसर्ग होणाऱ्या रूग्णांचं प्रमाण वाढतं आहे. दोन आठवड्यातच हे प्रमाण दुप्पट झालं. मे महिन्यात हे प्रमाण अगदी कमी होतं. आता मात्र हे प्रमाण 20 टक्के झालं आहे. या व्हेरिएंटवरला लढा देणारी फायझरची लस अमेरिकेकडे आहे. ही लस डेल्टा व्हायरसवर ८८ टक्के प्रभावी आहे तर अल्फा व्हेरिएंटवर ९३ टक्के प्रभावी आहे.

ALERT: Delta variant alarm for US; Dr. Fauchi claims; Learn in detail

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात