विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा जसजशी पुढे सरकत आहे, तस तसा भारत जोडायचा तर बाजूलाच राहू दे, उलट त्यांनीच निर्माण केलेली INDI आघाडी प्रत्येक टप्प्यावर फुटत चालली आहे. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि त्या पाठोपाठ नितीश कुमार यांनी INDI आघाडी सोडली. आपापल्या राज्यात आपले स्वतंत्र झेंडे उभारले. नितीश कुमार यांनी तर INDI सोडून पुन्हा सत्ताधारी NDA गोटात गेले. Akhilesh’s blow to INDI alliance, PDA flag raised in Uttar Pradesh
आता त्यांच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी INDI आघाडीला धक्का देत उत्तर प्रदेशात PDA अर्थात “पिछडा दलित आदिवासी” अशा आघाडीचा झेंडा उभारला. नुसता झेंडाच उभारून ते थांबले नाहीत, तर त्यांनी PDA आघाडीचे उमेदवार म्हणून समाजवादी पार्टीचे लोकसभा निवडणुकीतले 16 उमेदवार देखील जाहीर करून टाकले. 2024 ची लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी 16 उमेदवार जाहीर करून समाजवादी पार्टीने इतर सर्व पक्षांवर आघाडी घेतली. बाकी कुठल्याही पक्षाचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत.
पण उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेण्यापेक्षा अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेस प्रणित INDI आघाडीला धक्का दिला ही बाब मात्र अत्यंत महत्त्वाची आहे. कारण उमेदवार जाहीर करताना त्यांनी त्या यादीवर जी घोषणा लिहिली आहे, ती अधिक महत्त्वाची आहे. होगा PDA के नाम – अबकी एकजूट मतदान!! ही ती घोषणा आहे. ही घोषणा आणून लिहून अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातून INDI आघाडी विसर्जित करून टाकली आहे.
pic.twitter.com/IHwA5ENmYP — Samajwadi Party (@samajwadiparty) January 30, 2024
pic.twitter.com/IHwA5ENmYP
— Samajwadi Party (@samajwadiparty) January 30, 2024
अखिलेश यादव यांनी परवाच काँग्रेसला लोकसभेच्या 11 जागा दिल्याचे ट्विट केले होते. पण काँग्रेसने त्या 11 जागा अमान्य केल्या होत्या आणि अखिलेश यादव यांच्याकडे किमान 16 जागा मागितल्या होत्या. पण अखिलेश यादव यांनी काँग्रेसचा तो प्रस्ताव नाकारला. पण त्याची उघड वाच्यता करण्यापेक्षा त्यांनी समाजवादी पार्टीची यादी जाहीर करताना त्यावर INDI आघाडीऐवजी PDA लिहून आपला INDI आघाडी तोडण्याचा अप्रत्यक्ष इरादाच स्पष्ट करून टाकला.
या यादीत अखिलेश यादव यांनी प्रथमच शाक्य समुदायाच्या उमेदवारांचा समावेश केला आहे, त्याचबरोबर मुस्लिम दलित आणि आदिवासी यांनाही तिकिटे देण्याचे सोशल इंजिनिअरिंग केले आहे. यादव घरातल्याच तिघांना त्यांनी पहिल्याच यादीत उमेदवारी देऊन आपली घराणेशाही पक्की करण्याचा प्रयत्न केला आहे.
पत्नी डिंपल यादव, पुतण्या अक्षय यादव आणि चुलत भाऊ धर्मेंद्र यादव यांच्याबरोबरच 93 वर्षांच्या शफिकुर रहमान बर्क यांना पहिल्याच यादीत स्थान दिले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App