पल्लवी पटेलने केली असदुद्दीन ओवेसींशी हातमिळवणी
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : अपना दल (कामेरवादी) नेत्या पल्लवी पटेल यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष AIMIM सोबत युती केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या (एसपी) अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण पल्लवी यांनी ‘मागास, दलित आणि मुस्लिम’ यांना एका व्यासपीठावर आणून अखिलेश यादव यांच्या ‘मागास, दलित आणि अल्पसंख्याक’ मोहिमेला प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आहे. Akhilesh Yadavs problems will increase due to the new alliance for the Lok Sabha elections in Uttar Pradesh
महाराष्ट्र ATS प्रमुख सदानंद दाते NIA चे नवे महासंचालक; उत्तर प्रदेश केडरचे IPS पीयूष आनंद NDRF प्रमुख
पल्लवी पटेल आणि ओवेसी यांच्यात युतीबाबत बैठक झाली आहे. दोन्ही नेत्यांचे एकत्र फोटोही समोर आले आहेत. यावेळी पल्लवी पटेल यांचे पती पंकज निरंजनही त्यांच्यासोबत दिसले. मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी पटेल आणि असदुद्दीन ओवेसी यांची काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये भेट झाली होती.
या युतीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी ओवेसी आज म्हणजेच ३१ मार्च रोजी लखनऊला पोहोचणार आहेत. पल्लवी पटेल आणि ओवेसी दुपारी लखनऊच्या क्लार्क हॉटेलमध्ये एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये संभाव्य जागावाटपाची घोषणा केली जाऊ शकते.
Aaj Tak च्या रिपोर्टनुसार, पल्लवी पटेलला 2024 ची लोकसभा निवडणूक समाजवादी पार्टीसोबत लढवायची होती. त्या सपाकडे फुलपूर, मिर्झापूर आणि कौशांबीच्या जागांची मागणी करत होत्या. मात्र अखिलेश यादव यांनी मिर्झापूरमधून आपला उमेदवार उभा केला. असे करून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यसभा निवडणुकीतही दोन्ही पक्षांमध्ये मतभेद पाहायला मिळाले. त्यावेळी पल्लवी पटेल यांनी अखिलेश यादव यांनी त्यांचा पीडीए (मागास, दलित, अल्पसंख्याक) फॉर्म्युला सांभाळला नाही, असे म्हणत सपा उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्यास नकार दिला होता
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App