भाजपमधून 33 % महिलांना उमेदवारी द्या; अखिलेश यादवांचे मोदींना आव्हान; पण घराणेशाही पक्षांवरच टांगती तलवार!!


विशेष प्रतिनिधी/वृत्तसंस्था

भोपाळ : नव्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 33 % महिला आरक्षण विधेयक मंजूर करून घेतल्यानंतर ज्या समाजवादी पार्टीने 27 वर्षे ते विधेयक अडकवून ठेवले होते, त्या समाजवादी पार्टीच्या नेते अखिलेश यादवांनी मोदींना एक आव्हान दिले आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपकडून 33 % टक्के महिलांना उमेदवारी देऊन दाखवा, असे ते आव्हान आहे. Akhilesh yadav challenges PM Modi to give tickets to 33 % women from BJP, but it will boomerang on dynastic parties

मुलायम सिंह यादव यांच्यापासून अखिलेश यादव यांच्यापर्यंत समाजवादी पार्टीच्या प्रत्येक नेत्याने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत अडवून धरले होते. मोदी सरकार आल्यानंतर नव्या संसदेत प्रवेश करतात सरकारने पहिले विधेयक म्हणून 33 % आरक्षणाचे विधेयक मंजूर करून घेतले. मोदी सरकारकडे पुरेसे संख्याबळ असल्याने हे विधेयक मंजूर करून घेताना विरोधकांपैकी कोणत्याच खासदाराची त्यांना गरज उरली नव्हती. त्यामुळे काँग्रेस सह सर्व विरोधकांनी महिला विधेयकाला बिनबोभाट पाठिंबा देऊन आपणही महिला विधेयकाच्या बाजूने असल्याचा आव आणला होता.

गेल्या काही दिवसांत मोदींनी विरोधकांना त्या मुद्द्यावर एक्सपोजही केले. महिलांच्या ताकदीपुढे सगळ्या विरोधकांना झुकावे लागले आणि महिला आरक्षण विधेयकाला संसदेत पाठिंबा द्यावा लागला, अशी वक्तव्य मोदींनी नारीशक्ती संमेलनांमधून केली.

या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी मोदींनाच भाजपमधून 33% महिलांना उमेदवारी द्या, असे आव्हान दिले. आता हे आव्हान जर मोदींनी पेलले आणि ते पूर्ण केले, तर ते आव्हान मोदींसाठी राहणार आहे की विरोधकांसाठी??, हा मात्र खरा प्रश्न आहे!!

– प्रादेशिक पक्षांवरच टांगती तलवार

कारण काँग्रेस वगळून बाकी कोणत्याच पक्षाकडे लोकप्रतिनिधित्वाचे एवढे संख्याबळ नाही, की ते 33% महिला आरक्षणाची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अंमलबजावणी करू शकतील!! प्रादेशिक घराणेशाही पक्षांनी 33 % आरक्षणातून महिलांना उमेदवारी दिली, तर अनेक घराण्यांचे राजकारणच संपुष्टात येण्याची भीती आहे. कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला उमेदवार संबंधित पक्षांकडे उपलब्ध करवून घेणे हेच मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे अखिलेश यादवांनी मोदींना दिलेले आव्हान भाजप कदाचित 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण करूनही टाकेल, पण तेच आव्हान प्रादेशिक पक्षांच्या मात्र डोक्यावर टांगती तलवार ठेवेल हे मात्र निश्चित!!

Akhilesh yadav challenges PM Modi to give tickets to 33 % women from BJP, but it will boomerang on dynastic parties

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात