विशेष प्रतिनिधी
लखनौ – कासगंजमध्ये पोलिस कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी भाजप सरकारला धारेवर धरले आहे. उत्तर प्रदेशचे पोलिस म्हणजे `ठोको पोलिस’ आहेत हे दाखवून देणारे आणखी एक प्रकरण कासगंजच्या रूपाने घडले आहे, असा दावा करून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली.Akhilesh, Priyanka targets Yogi govt.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, कासगंजमध्ये अल्ताफ, आग्रा येथे अरुण वाल्मीकी, सुलतानपूरमध्ये राजेश कोरी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. अशा प्रकरणांवरून उत्तर प्रदेशात रक्षक हेच भक्षक बनल्याचे स्पष्ट होते.
अखिलेश म्हणाले की, पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलाविण्यात आलेल्या तरुणाचा मृत्यू अत्यंत संशयास्पद आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याच्या नावाखाली काही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करणे ही निव्वळ धूळफेक आहे. भाजप राजवटीत पोलिसांविषयी विश्वास निर्माण व्हावा म्हणून न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.
कासगंजमध्ये एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी २२ वर्षांच्या अल्ताफला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला कोठडीत ठेवण्यात आले. नंतर तो स्वच्छतागृहात गेला. बराच वेळा होऊनही तो बाहेर न आल्यामुळे पोलिसांनी दार ढकलले. त्यावेळी अल्ताफने जॅकेटवरील हूडची दोरी पाण्याच्या पाईपला टांगून गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिस ठाणे प्रमुखासह पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App