वृत्तसंस्था
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची जीएसटी परिषदेच्या सुधारणा समितीच्या प्रमुखपदी केंद्र सरकारने नियुक्ती आज केली आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकीय वर्तुळात भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जवळीकता तर वाढत नाही ना ?, अशी कुजबूज सुरु झाली आहे.Ajit Pawar Head of GST Reform Committee, Responsibilities assigned by Central Government; BJP- Rumors of NCP’s closeness
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. आगामी काही महिन्यात या सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. अगोदरच तीन पक्षांचे म्हणजेच शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस यांच्यामध्ये विविध मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तीन दिशेला तीन तोंडे असून ते एकमेकांवर आरोप करत आहेत.
त्यात अनिल देशमुख, अनिल परब, हसन मुश्रीफ यांच्यावर कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केल्याचा आरोप होत आहे. पोलिस दलातील बडे अधिकारी परमवीर सिंग आणि सुपर कॉप सचिन वाझे यांचे १०० कोटींचे वसुली प्रकरणे ,भ्रष्टाचार तसेच मुख्यमंत्र्यांचे १९ बंगले प्रकरण, आता आनंदराव अडसूळ यांचा घोटाळा या ना त्या प्रकरणामुळे खरे तर बारामतीकरांना याचा ताप होत आहे.
त्याची प्रत्यक्ष, प्रत्यक्ष झळही बसू लागली आहे. अनिल देशमुखांना बारामतीकरांनीच लपवून ठेवले येथेपर्यंत आरोप झाले आहेत. परमवीर सिंह यांचाही पत्ता नाही. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर कोण पुढे होतो आणि भाजपचा हात पकडतो. तोच भविष्यात महाराष्ट्रात राज्य करणार आहे, असे चित्र दिसत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे आजी, माजी, भावी, असे सांगून मनातील खदखद व्यक्त केली. तिकडे गोविंदबागेत घाम फुटला. चक्क कोथळ्याचा विषय त्यांनी काढला. त्यानंतर संजयाच्या शिष्टाईने प्रकरणावर पडदा पडला आहे. आग विझली तर धूर बाहेर पडतो. मुख्यमंत्र्यांचे ऐकायचे हं, दिल्लीला ते गेले आहेत, असे टोमणे मारले जातात. तिकडे अनंत गीते यांनी तर शरद पवार आमचे नेते नाहीत, अशी डरकाळी फोडली. त्यातून गोविंद बागेत संतापाचा कडेलोट झाला.
या व अशा घटना घडत असताना अजित पवार यांना दिल्लीतील जीएसटी सुधारणा समितीचे प्रमुख म्हणून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नियुक्त केले आहे. दिल्लीत यावरून राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे लखनौ येथे आयोजित जीएसटी परिषदेच्या बैठकीला अजित पवार गेले नव्हते.
पण, त्यावेळी त्यांनी पेट्रोल, डिझेल, गॅसचा जीएसटीत समावेश करून या बाबी जनतेला स्वस्त दरात देण्यास सुद्धा जोरदार विरोध केला होता. त्यावरून त्यांच्याविरोधात राज्यातील जनतेत रोष आहे. पण सध्याच्या महागाईत आणि कोरोनाच्या संकटात सामान्यांसाठी इंधन स्वस्त होत असताना त्याला विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. आता त्यांना या सुधारणा समितीचे प्रमुख केंद्र सरकारने बनविले आहे, हे विशेषच आहे
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App