विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाश्मिमात्य माध्यमांच्याच गळ्यात घातली त्यांची बेजबाबदारी; पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यामध्ये भारताच्या नुकसानीचे पुरावे मागून केली आरोपांची चाळणी!!, असे आज घडले. Ajit Doval
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षात आत्तापर्यंत पाकिस्तान आणि पाश्चिमात्य माध्यमे पाकिस्तानी विजयाचे ढोल बडवत होती. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताचे नुकसान झाल्याच्या बाता मारत होती. पाकिस्तानने भारताची सहा राफेल विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानी सरकारने केला होता.
पाकिस्तानचा स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीर हा तर पाकिस्तानच्या मोठ्या विजयाचा दावा ठोकत होता. मात्र, भारताने सैन्य दलाच्या पातळीवरून पाकिस्तानचे सगळे दावे फेटाळले होते. पण पाश्चिमात्य माध्यमे भारताचे म्हणणे ऐकून घ्यायच्या मन:स्थितीत नव्हती. न्यूयॉर्क टाइम्स सारख्या माध्यमातून पाकिस्तानच्याच विजयाचे ढोल बडवले होते.
मात्र, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज पाश्चिमात्य माध्यमे आणि पाकिस्तान यांची सगळी पोल खोलली. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताचे जे नुकसान झाले, असा दावा तुम्ही करताय त्याचा एक तरी व्हिडिओ किंवा फोटो आम्हाला दाखवा, असे प्रति आव्हान अजित डोवाल यांनी पाश्चिमात्य माध्यमे आणि पाकिस्तान यांना दिले.
भारताने पाकिस्तान मध्ये घुसून केलेल्या हल्ल्यामध्ये तिथले दहशतवादी अड्डे नष्ट केले याचे पुरावे भारतीय सैन्य दलांनी पत्रकार परिषदा घेऊन दिले. पण पाकिस्तानने फक्त भारताची सहा राफेल विमाने पाडल्याचे दावे केले त्याचा एकही फोटो किंवा व्हिडिओ ते दाखवू शकले नाहीत. त्याचबरोबर पाश्चिमात्य माध्यमांनी देखील तसे कोणते पुरावे दिले नाहीत. अजित डोवल यांनी नेमक्या याच मुद्द्यावर बोट ठेवून दोघांच्याही fake narrative ला हाणून पाडले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App