विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – केंद्र सरकारने ‘सी-२९५’ ही ५६ लष्करी मालवाहू विमाने खरेदी करण्यासाठी स्पेनच्या ‘एअरबस डिफेन्स अँड स्पेस’ या कंपनीसोबत २० हजार कोटी रुपयांच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.AIRBUS will provide aircrafts to India
देशातील लष्करासाठी वापरण्यात येणाऱ्या मालवाहू विमानांच्या निर्मितीची जबाबदारी एखाद्या खासगी कंपनीकडे सोपविली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. या करारानुसार एअरबस कंपनीकडून देण्यात येणारी पहिली सोळा विमाने ही थेट उड्डाणास सज्ज असतील.
या विमानांची शेवटच्या टप्प्यातील जुळवणी ही स्पेनमधील सेव्हिले येथे करण्यात येईल. यानंतर चाळीस विमानांची निर्मिती आणि जुळवणी टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स या कंपनीकडून करण्यात येईल. या करारानंतर टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी एअरबस डिफेन्सचे स्वागत केले आहे. देशातच उड्डाण प्रकल्प सुरू करण्याच्या अनुषंगाने टाकलेले हे मोठे पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App