विशेष प्रतिनिधी
टोरंटो : कॅनडामध्ये यॉर्क विद्यापीठाच्या संशोधकांनी वायु प्रदूषणाशी निगडित एक निरीक्षणात्मक अभ्यास केला आहे. या अभ्यास अहवालात त्यांनी असे म्हटले आहे की धुके नसलेले निळसर स्वच्छ आकाश यामुळे आरोग्य समस्या निर्माण करणारे प्रदूषक दिसून येत नाहीत. भारतात जेव्हा पहिली टाळेबंदी झाली, त्यावेळी वाहनातून होणारे उत्सर्जन कमी झाल्याने वायू प्रदूषण कमी झाले. परंतु हवेच्या गुणवत्तेमध्ये अपेक्षेनुसार सुधारणा घडून आली नाही.
Air pollution decreased during lockdown in India but ozone levels are increased
आरोग्यासाठी हानिकारक असलेले इतर प्रदूषकांचे प्रमाण जरी कमी झाले असले तरी ओझोनची पातळी वाढली असल्याचे या अभ्यासामध्ये आढळून आले आहे. ही खुप आश्चर्याची गोष्ट आहे. त्या कालावधीत हवा खूपच स्वच्छ झाली असूनसुद्धा सूर्यप्रकाश अधिक असल्याने ३० टक्क्यांपर्यंत ओझोनच्या पातळीमध्ये वाढ झाली. संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये ही महत्वाची बाब समोर आली.
वायू प्रदूषणात जगात दिल्लीचा पहिला क्रमांक; प्रदूषणास शेजारील राज्ये अधिक जबाबदार
२४ मार्च ते २४ एप्रिल या काळात झालेल्या टाळेबंदीमध्ये भारतातील महत्वाची शहरे हैदराबाद आणि दिल्ली येथील नायट्रोजन ऑक्साईड, ओझोन आणि घातक सूक्ष्मकण या हवामानातील घटकांचा विशेष अभ्यास करण्यात आला. वायु गुणवत्ता निरीक्षण केंद्रातून या तीनही घटकांच्या पातळीचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला. यातून मिळालेल्या तपशिलाची संशोधकांनी मागील तीन वर्षातील सारख्या तारखांशी तुलना केली. यातून टाळेबंदीच्या काळात झालेल्या बदलांचे मूल्यमापन करण्यात आले. या निरीक्षणामध्ये असे आढळून आले की, पीएम २.५ आणि नायट्रोजन ऑक्साईडची पातळी ५७ आणि ७५ टक्क्यांनी घसरली होती. मात्र हवामानशास्त्राचा अभ्यास केला असता या दोन्ही शहरांमध्ये ओझोनची पातळी ५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढली तर पीएम २.५ ची टक्केवारी आठ टक्क्यांनी घसरली.
वातावरणातील रासायनिक प्रक्रिया व हवामान बदल हे वायू प्रदूषणाच्या पातळीमध्ये स्वतंत्ररीत्या वाढ करीत असतात. संशोधकांनी असेही सांगितले की उत्सर्जनाचे स्थानिक स्त्रोत जसे इंधन जाळणे किंवा वाहने यांचा प्रादेशिक उत्सर्जन स्त्रोतांपेक्षा वायू प्रदूषणाच्या स्तरांवर कमी प्रभाव असतो. वायुरूप सेंद्रिय संयुगे दिल्लीतील ओझोन निर्मितीवर परिणाम करत असतात. त्यामुळे ते कमी करण्यासाठी प्रभावी उपायांकडे लक्ष दिले पाहिजे असे संशोधकांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App