विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी नवीन माहिती समोर आली आहे. एअर इंडियाने 30 नोव्हेंबरपर्यंत भारतातून तेल अवीव, इस्रायलला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. कंपनीने 7 ऑक्टोबरपासून तेल अवीवला जाणारी आणि तेथून येणारी उड्डाणे रद्द केली आहेत.Air India has canceled all flights from India to Tel Aviv and Israel till November 30
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध हे यामागचे कारण असल्याचे बोलले जात आहे. रविवारी प्रसारमाध्यमांना माहिती देताना कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, एअर इंडिया दिल्लीहून तेल अवीवला आठवड्यातून 5 उड्डाणे पाठवते.
सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी उड्डाणे सुटतात. गेल्या महिन्यातच, इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअरलाइनने ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत उड्डाणे सुरू केली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायल-हमास युद्ध संपत नाहीये. हमासला नेस्तनाबूत करण्यासाठी इस्रायल गाझा पट्टीवर सातत्याने हवाई हल्ले करत आहे. हिजबुल्लाही युद्धात उतरली आहे. इस्रायलवर सतत हल्ले करत आहेत. दुसरीकडे, इस्रायल युद्धविराम न पाळण्यावर ठाम आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App